FIFA World Cup : प्रसिद्ध मॉडेलने मोडले अश्लिलतेचे नियम, आता 'ही' शिक्षा होणार?
फिफा वर्ल्ड कपच्या (FIFA World Cup) सुरुवातीलाच प्रेक्षकांवर अनेक नियम घालून देण्यात आले होते. जसे दारूबंदी, अथवा महिला टाइट फिटिंग कपडे घालू शकत नाहीत. खांद्याच्या वरील भाग झाकलेला हवा आणि गुढघ्याच्या वर असलेले कपडे घालता येणार नाहीत. अशाप्रकारचे नियम ठेवण्यात आले होते.
Ivana Knoll Model Miss Croatia: जगभरात सध्या फुटबॉलचा फिव्हर आहे. या फिव्हरमध्ये फुटबॉल प्रेमी न्हाऊन निघत आहेत. त्यात एकापेक्षा एक दर्जेदार सामने या वर्ल्ड कपमध्ये (FIFA World Cup) पाहायला मिळत आहेत. त्यामुळे फुटबॉल प्रेमींचे चांगलेच मनोरंजन होत आहे. त्यात आता कतारमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये एका प्रसिद्ध मॉडेलने फुटबॉलचे नियम मोडल्याची घटना घडलीय. त्यामुळे आता तिला काय शिक्षा होते हे पाहावे लागणार आहे.
![ivana knoll](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/29/541428-f1.jpg)
फिफा वर्ल्ड कपच्या (FIFA World Cup) सुरुवातीलाच प्रेक्षकांवर अनेक नियम घालून देण्यात आले होते. जसे दारूबंदी, अथवा महिला टाइट फिटिंग कपडे घालू शकत नाहीत. खांद्याच्या वरील भाग झाकलेला हवा आणि गुढघ्याच्या वर असलेले कपडे घालता येणार नाहीत. अशाप्रकारचे नियम ठेवण्यात आले होते. हे नियम आता एका प्रसिद्ध मॉडेलने मोडले आहेत.
![ivana knoll](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/29/541426-f2.jpg)
![ivana knoll](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/29/541425-f3.jpg)
इव्हाना (Ivana Knoll) क्रोएशियाच्या मोरोक्कोविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी अल-बैत स्टेडियममध्ये गेली होती. तिने आपल्या देशाचा लाल आणि पांढरा पॅटर्नचा ड्रेस परिधान केला होता. मात्र कतारच्या कायद्यानुसार हा ड्रेस योग्य आढळला नाही. त्यामुळे इव्हाना नोलवर आक्षेपार्ह पोशाख घालून सामना पाहण्यासाठी आल्याचा आरोप असून तिच्यावर कारवाई होऊ शकते.
![ivana knoll](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/29/541424-f4.jpg)