काय सांगता! ब्रेकअप झाल्यावर आठवडाभर सुट्टी; 'या' कंपनीने दिली ब्रेकअप लिव्ह

Break Up Leave Policy : मनाच्या असहाय्य वेदना दु:खाच्या वाटा बाजूला सारून हृद्यातून वाहू लागतात तेव्हा अश्रूंचा बांध फुटतो. नात्यांचा बंधात अडकलेली व्यक्ती स्वत:ला देखील सावरू शकत नाही. त्यावेळी गरज असते. समोरच्याला वेळ देण्याची... 

| Apr 07, 2024, 22:00 PM IST

FinTech Firm Introduces Break Up Leave : ब्रेकअप झाल्यावर मित्रमंडळी सावरतात. मात्र, दु:खातून बाहेर येण्यासाठी वेळेची गरज असते. याच आयुष्याच्या कठीण प्रसंगी तुमची कंपनी मदतीला धावून आली तर...

1/8

ब्रेकअप लिव्ह पॉलिसी

होय, एका कंपनीने चक्क ब्रेकअप लिव्ह पॉलिसी सुरू केली आहे. यामध्ये ब्रेकअप झाल्यावर कंपनी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देणार आहे.

2/8

भारतीय कंपनी

ब्रेकअप लिव्ह पॉलिसी म्हटल्यावर तुमच्या डोक्यात परदेशातील एखादी कंपनी आली असेल. मात्र, ही कंपनी परदेशातील नसून भारतीय कंपनी आहे.

3/8

एका आठवड्याची सुट्टी

ब्रेकअप लिव्ह पॉलिसीनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचं ब्रेकअप झालं तर कर्चमारी एका आठवड्याची सुट्टी घेऊ शकतात.

4/8

खासगी आयुष्य

एवढंच नाही तर ब्रेकअप लिव्ह पॉलिसीनुसार कर्मचाऱ्याने सुट्टी घेतली तर त्याला बॉस प्रश्न देखील विचारणार नाही. कर्मचाऱ्याच्या खासगी आयुष्याची काळजी घेतली जाईल.

5/8

कारण नको ना पुरावा नको...

तुम्ही सुट्टी का घेतली? असा प्रश्न देखील कंपनी विचारणार नाही. तसेच पुरावा देखील मागितला जाणार नाही. गरज असेल तर सुट्टीची मुदत देखील वाढवून दिली जाईल.  

6/8

मानसिक शांती

लोकांच्या कठीण प्रसंगी आपण कंपनीच्या मागे खंबीरपणे उभं रहायचं असतं. सुट्टी दिली तर मानसिक शांती मिळेल आणि येत्या काळात कर्चमारी चांगलं काम देखील करतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.

7/8

फिनटेक

कर्चमाऱ्यांची ऐवढी काळजी घेणारी कंपनी कोणती? असा सवाल तुम्हालाही पडला असेल. तर या कंपनीचं नाव फिनटेकमधील स्टॉक ग्रो कंपनी आहे.

8/8

स्टॉक ग्रो

स्टॉकग्रो ही भारतातील प्रिमियम फिनटेक स्टार्टअप आहे. जी वापरकर्त्यांना ट्रेडिंग आणि गुंतवणुकीची माहिती मिळवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून देते.