हुबेहूब Madhuri Dixitसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्री; एक तर हॉलिवूड गाजवते

बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थातचं माधुरी दीक्षितच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.  

May 28, 2021, 15:23 PM IST

बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थातचं माधुरी दीक्षितच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. वयाच्या पन्नासाव्या वर्षी देखील माधुरीचं सौंदर्य इतरांना लाजवेल असं आहे. सौंदर्यासोबतचं देवाने तिला भेट म्हणून नृत्य कलेचं वरदान दिलं आहे. माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक मुली माधुरी सारखं दिसण्याचा प्रयत्न करतात. पण बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या काही अभिनेत्री सेम टू सेम माधुरीसारख्या दिसतात.

1/5

फरहीन

फरहीन

'सैनिक' चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री फरहीन हुबेहूब माधुरी दीक्षित सारखी दिसते.  पण माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकरसोबत लग्न झाल्यानंतर तिने कलाविश्वाचा निरोप घेतला.   

2/5

अभिनेत्री निकी वालिया

अभिनेत्री निकी वालिया

टीव्ही अभिनेत्री निकी वालिया नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. निकीला माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी म्हणतात.  

3/5

अभिनेत्री वलेरिया गोलिनो

अभिनेत्री वलेरिया गोलिनो

फक्त बॉलिवूडमध्येचं नाही तर हॉलिवूडमध्ये देखील माधुरीसारखी दिसणारी एक अभिनेत्री आहे. वलेरिया गोलिनो असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. वलेरिया गोलिनो ग्रीक इटालियन अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे.

4/5

अभिनेत्री अश्विनी भावे

अभिनेत्री अश्विनी भावे

अभिनेत्री अश्विनी भावेने 'हिना' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. प्रेक्षकांनी अश्विनीला डोक्यावर देखील घेतलं. पण ती गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या जगापासून दूर आहे. 

5/5

अभिनेत्री अंतरा माळी

अभिनेत्री अंतरा माळी

अत्यंत साधी दिसणारी अंतरा माळी माळी देखील हुबेहूब दिसते. अंतरा माळी नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.