उन्हाळ्यात 'या' पदार्थांमधून होते Food Poisoning, काय आहेत लक्षणे?

Food Poisoning Symptoms : अनेकजण व्यस्त जीवनशैलीमुळे मिळेल तसं जंक फूड खात असतात. मग याता परिणाम फूड पॉयजनिंग होते. फूड पॉयजनिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्वच्छता नसणे. याने तुम्हाला थकव्यासोबतच कमजोरी जाणवते. अशात काही खाणेही कठिण होऊन बसते. एक साधी समस्या देखील गंभीर होऊ शकते. म्हणूनच वेळेवर उपचार घेणे अधिक फायदेशीर ठरेल. फूड पॉयझनिंगची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या... 

May 29, 2023, 15:17 PM IST
1/6

उन्हाळ्यात खराब होणारे पदार्थ

Food Poisoning Symptoms

चिकन, वाटाणा, मासे, कांदा करी, मसालेदार भाजी, दूध चीज, हरभरा, मशरूम, कच्चे अंडे

2/6

उलट्या किंवा पोटदुखी

Food Poisoning Symptoms

काहीही खाल्ल्यानंतर उलटी झाल्यास किंवा पोटात दुखत असल्यास सावध व्हा. ही समस्या विषबाधामुळे होऊ शकते. अशावेळी जेवण केल्यावर किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळ होऊ शकते. जर तुम्हाला बराच काळ त्रास होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3/6

निर्जलीकरण आणि अशक्तपणा

Food Poisoning Symptoms

लूज मोशनसोबत तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. म्हणजे तुम्हाला जास्त तहान लागेल आणि तोंड कोरडे पडेल. त्यासोबत लघवी कमी होऊ शकते. त्यासोबतच तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

4/6

ताप

Food Poisoning Symptoms

अन्न विषबाधा झाल्यानंतर तुमचे शरीर गरम होते आणि तुम्हाला ताप आल्यासारखे वाटू शकते. म्हणजे जर तुम्हाला जास्त ताप आला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या... 

5/6

लूजमोशन

Food Poisoning Symptoms

अनेकदा अन्नातून विषबाधा झाल्यामुळे लूज मोशन होण्याची शक्यता अधिक असते. जी दोन ते तीन दिवस राहू शकते. 

6/6

पोटात गाठी येणे

Food Poisoning Symptoms

काही खाल्ल्यानंतर पोटात तीव्र वेदना होत असल्यास आणि पोटाच्या आजूबाजूला गाठी आल्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)