Forbes top 100 Richest Indians : Forbes 2022 कडून देशातील 100 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर

Forbes 2022 च्या यादीत Gautam Adani आणि Mukesh Ambani ना कितवं स्थान, अटीतटीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?  

Nov 29, 2022, 14:00 PM IST

Top 100 Richest Indians:  प्रत्येक वर्षी Forbes 100 व्यक्तींची यादी जाहीर करत असते. अनेकांना या यादीकडे लक्ष लागून राहीलेले असते. फोर्ब्स 2022 ने देशातील 100 श्रीमंत व्यक्तींची (Forbes top 100 Richest Indians) यादी जाहीर केली आहे. या सर्व लोकांची एकूण संपत्ती 25 अब्ज डॉलरने वाढून 800 अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत शेअर बाजारात (Share Market) घसरण झाली असली तरी टॉप 100 (Top 100) लोकांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

1/9

FORBES TOP 100 RICHEST INDIANS, TOP 100 RICHEST INDIANS

फोर्ब्सनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याकडे एकूण  1,211,460.11  कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2021 मध्ये त्यांची संपत्ती तिप्पट झाली आणि आता 2022 मध्ये ते पहिल्या क्रमांकावर आले आहेत.  

2/9

FORBES TOP 100 RICHEST INDIANS, TOP 100 RICHEST INDIANS

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची एकूण संपत्ती 710,723.26 कोटी रुपये आहे. 2013 नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा त्यांची रँक 2 व्या क्रमांकावर घसरली.  

3/9

FORBES TOP 100 RICHEST INDIANS, TOP 100 RICHEST INDIANS

राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani) हे DMart चेनचे मालक असून ते यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 222,908.66 कोटी रुपये आहे. दमाणी यांनी 2002 मध्ये एका स्टोअरसह रिटेल व्यवसायात प्रवेश केला, आता डीमार्टची देशभरात 271 दुकाने आहेत.  

4/9

FORBES TOP 100 RICHEST INDIANS, TOP 100 RICHEST INDIANS

सायरस पूनावाला (Cyrus S. Poonawalla), सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे अध्यक्ष, जगातील सर्वात मोठी लस उत्पादक, यांची एकूण संपत्ती रु. 173,642.62 कोटी आहे. त्यांच्या कंपनीने कोविड-19 साठी लस तयार करण्यासाठी अनेक करार केले आहेत. पूनावाला यांच्या मालमत्तेत स्टड फार्मचाही समावेश आहे.  

5/9

FORBES TOP 100 RICHEST INDIANS, TOP 100 RICHEST INDIANS

एचसीएल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष शिव नाडर (Shiv Nadar) यांची एकूण संपत्ती रु. 172,834.97 कोटी आहे. शिव नाडर हे भारतीय आयटी (IT) क्षेत्रातील अव्वल व्यावसायिकांपैकी एक आहेत. त्यांनी चालू वर्षात शिक्षणाशी संबंधित कामासाठी 662 दशलक्ष डॉलर्स दान केले. संपत्तीत घट होऊनही त्याने टॉप 10 मध्ये आपले स्थान कायम राखले आहे.  

6/9

FORBES TOP 100 RICHEST INDIANS, TOP 100 RICHEST INDIANS

ओपी जिंदाल (O.P. Jindal) ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल (Savitri Jindal) या फोर्ब्सच्या टॉप 10 यादीतील एकमेव महिला अब्जाधीश आणि सक्रिय राजकारणी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 132,452.97 कोटी रुपये आहे.  

7/9

FORBES TOP 100 RICHEST INDIANS, TOP 100 RICHEST INDIANS

सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक दिलीप सांघवी (Dilip Shanghvi) यांची एकूण संपत्ती रु. 125,184.21 कोटी आहे. यानंतर हिंदुजा ब्रदर्स (Hinduja Brothers) आठव्या स्थानावर आहे. श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हे हिंदुजा ब्रदर्सच्या चार भावंडांपैकी आहेत. हिंदुजा ग्रुपची (Hinduja Group) सुरुवात १९१४ मध्ये परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली होती. त्यांची एकूण संपत्ती 122,761.29 कोटी रुपये आहे.  

8/9

FORBES TOP 100 RICHEST INDIANS, TOP 100 RICHEST INDIANS

आदित्य बिर्ला समूहाचे (Aditya Birla Group) अध्यक्ष कुमार बिर्ला यांची एकूण संपत्ती 121,146.01 कोटी रुपये आहे. नवव्या क्रमांकावर असलेल्या कुमार बिर्ला यांचा व्यवसाय कपड्यांपासून ते सिमेंटपर्यंत पसरलेला आहे.  

9/9

FORBES TOP 100 RICHEST INDIANS, TOP 100 RICHEST INDIANS

बजाज ग्रुपचे (Bajaj Group) 40 कंपन्यांचे नेटवर्क आहे. 1926 साली जमनालाल बजाज यांनी 96 वर्षांच्या कुटुंबाच्या नेतृत्वाखालील व्यवसायाची सुरुवात मुंबईतून केली होती. त्यांच्याकडे एकूण 117,915.45 कोटी रुपयांची संपत्ती आहे.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x