Friendship Day 2019: मित्रांसोबत 'हे' चित्रपट पाहायलाच हवेत

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार 'फ्रेंडशिप डे' म्हणून साजरा केला जातो. कलाविश्वात चित्रपटांमध्ये 'मैत्री' हा फॉर्मुला नेहमीच हिट ठरला आहे. चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली मैत्री अनेक जण आपल्या खऱ्या आयुष्यातही संबंध जोडतात. मैत्रीवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते.

Aug 03, 2019, 14:28 PM IST
1/5

दिल चाहता है

२००१ मध्ये आलेला फरहान अख्तर दिग्दर्शित 'दिल चाहता है' हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या ३ मित्रांच्या गोष्टीमध्ये तिघांमध्ये झालेले गैरसमज आणि एकमेकांप्रती असलेलं प्रेम चित्रपटातून सुरेखपणे मांडण्यात आलं आहे.   

2/5

रंग दे बसंती

राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'रंग दे बसंती' चित्रपटात कथा जबरदस्तरित्या साकारण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीची जोड घेत विविध सामाजिक आणि आर्थिक वर्गातून आलेल्या मित्रांची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. सर्व मित्रांनी पाहिलेल्या स्वप्नाला ते एकत्र पुढे नेतात आणि त्याला एकत्रितपणे पूर्ण करण्याचा प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

3/5

जिंदगी ना मिलेगी दोबारा

२०११ मध्ये आलेल्या झोया अख्तर दिग्दर्शित 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या मैत्रीवर आधारित चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. ३ खास मित्रांची गोष्ट चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एका मित्राच्या बॅचलर ट्रिपसाठी तिघेही भेटतात आणि त्या ट्रिपदरम्यान त्यांचं संपूर्ण जीवनच कसं बदलून जातं, यावर आधारित चित्रपटाची गोष्ट अनेकांना आपल्या जुन्या आठवणीत रमवते. तुमच्या मित्रांशी बोलणं, त्यांचं तुमच्या आयुष्यात असणं किती गरजेचं आहे, मैत्रीला जीवनातील महत्त्वाच्या पैलूंशी जोडत चित्रपटाची कथा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

4/5

३ इडियट्स

राजकुमार हिरानी दिग्दर्शित २००९ मध्ये आलेला '३ इडियट्स' अनेकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत वरच्या स्थानी आहे. चित्रपटातून देण्यात आलेला संदेश उत्कृष्टरित्या मांडण्यात आला आहे. 

5/5

वीरे दी वेडिंग

२०१८ मध्ये आलेला 'वीरे दी वेडिंग' चित्रपट तीन मैत्रिणींच्या आयुष्यावर आधारित आहे. शालेय जीवनापासून असलेली मैत्री पुढील जीवनातही एकमेकींना कशाप्रकारे आधार देतात. अशा ३ मैत्रिणींची भावनिक, मजेशीर गोष्ट दाखवण्यात आली आहे.