प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत संचलनाची रंगीत तालीम

Jan 23, 2020, 15:58 PM IST
1/5

२६ जानेवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीत फुल ड्रेस रिहर्सल परेड प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. ही परेड विजय चौकातून सुरु होत लाल किल्ला येथे पोहचली. यासाठी दिल्लीतील काही मार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.

2/5

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनाच्या रंगीत तालीमसाठी दिल्लीत कडेकोट सुरक्षा करण्यात आली होती.

3/5

या संपूर्ण संचलनात भूदल, नौदल आणि वायूदलाकडून थरारक दृष्य सादर करण्यात आली. संचलनाच्या सरावादरम्यान तेथे हजर असणाऱ्या लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता.

4/5

फुल ड्रेस परेड रिहर्सल दरवर्षी २६ जानेवारीच्या काही दिवस आधी आयोजित केली जाती. यावेळी नौदलाकडून अतिशय थरारक साहसी प्रात्यक्षिकं सादर केली जातात.

5/5

या परेडदरम्यान, सैनिक घोड्यांवर स्वार होताना दिसले. या परेडमध्ये जवळपास ४६ सुसज्ज घोडेस्वारांची एक तुकडी आकर्षणाचे केंद्र होती.