गणेशोत्सवात करा अष्टविनायकाचं दर्शन, जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

Ashtavinayank Ganpati History and Importance : काही दिवसांनीच गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यातून तुम्ही जर का गणपतीच्या उत्सवासाठी अष्टविनायकाच्या दर्शनाला जाणार असला तर थोडा वेळ काढा आणि या लेखातून जाणून द्या अष्टविनायकाच्या आठ गणपतींचा इतिहास आणि महत्त्वं.

Sep 17, 2023, 17:26 PM IST

Ashtavinayank Ganpati History and Importance : येत्या काही दिवसांवरच गणपतींचे आगमन होणार आहे. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया की अष्टविनायकाच्या आठही गणपतींचे महत्त्व काय आणि इतिहास काय हे जाणून घेऊया. 

1/8

श्री महागणपती (रांजणगाव)

ganpati 2023 news

आपण आठव्या गणपतीपासून सुरूवात करूया. पुणे येथील रांजणगाव येथे महागणपतीचं मंदिर असून येथे कमळावर बसलेल्या गणपतीची मुर्ती आहे व बाजूला रिद्धी व सिद्धी आहेत. या गणपतीला महोत्कट असंही म्हटलं जातं. या गणपतीला 10 सोंडी आणि 20 हात आहेत. (Photo: Social Media)

2/8

श्री विघ्नेश्वर (ओझर)

ganpati 2023 dhol tasha

अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणजे श्री विघ्नेश्वर, ओझर. हा गणपती ओझर या गावी आहे. या ठिकाणीच श्री गणेशानं विघ्नासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तेव्हा या गणपतीस विघ्नेश्वर हे नावं पडलंय. (Photo: Social Media)

3/8

श्री गिरीजात्मज (लेण्याद्री)

ganpati 2023 fashion

पुणे या जिल्ह्यात लेण्याद्री गावात श्री गिरीजात्माजाचं मंदिर स्थि आहे. हे मंदिर बौद्धगुहेच्या ठिकाणी बांधलं आहे. गिरीजात्माजा म्हणजे गिरीजा आणि आत्मज. गिरीजा म्हणजे देवी पार्वती आणि तिचा पुत्र आत्मज. या मंदिराला 300 पायऱ्या आहेत. (Photo: Social Media)

4/8

श्री चिंतामणी (थेऊर)

ganpati 2023 today news

श्री चिंतामणी, थेऊर हे मंदिर मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर आहे. हा डाव्या सोंडेचा गणपती आहे. या गणपतीचे डोळे हे हिऱ्यांचे आहेत. येथे श्रीमंत माधवराव आणि रमाबाई पेशवे यांची समाधी आहे. (Photo: Social Media)

5/8

श्री वरदविनायक (महड)

ganpati 2023 news in marathi

हा गणपती नवसाला पावणारा आहे असं सांगितलं जातं. या मंदिराच्या चारही बाजूस हत्ती आहेत. (Photo: Social Media)

6/8

श्री बल्लाळेश्वर (पाली)

ganpati 2023

गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ यांच्या नावावरून या मंदिराचे नावं हे बल्लाळेश्वर असं आहे. (Photo: Social Media)

7/8

श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक)

trending news

सिद्धटेक येथे अष्टविनायकातील दुसरा गणपती आहे. मधु आणि कैटभ राक्षसांचे भगवान विष्णू यांच्याशी युद्ध सुरू होते. परंतु यात त्यांना यश मिळत नव्हतं. भगवान शंकरांनी श्री गणेशाचे स्मरण व प्रार्थना करण्यास सांगितले. व त्यांना या युद्धात यश आले. (Photo: Social Media)

8/8

मयूरेश्वर (मोरगाव)

news today

अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मयूरेश्वर. मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध श्री गणरायानं केला होता, अशी आख्यायिका आहे. (Photo: Social Media) (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)