दिलासा! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता 600 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडरचे; नवे दर पाहूनच घ्या

LPG Cylinder Subsidy: गॅस ग्राहकांसाठी ही सर्वात मोठी बातमी असून, निवडणुकांपूर्वी केंद्र शासनानं एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या पैशांची बचतही होणार आहे. 

Oct 04, 2023, 16:10 PM IST

LPG Cylinder Subsidy: आगामी निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच आता देशात त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून तळागाळातील मतदारांना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णयही घेतले जात आहेत.

1/7

आणखी एका निर्णयाची भर

gas cylinder price ujjwala yojana subsidy increase by 200 rupees

सातत्यानं केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयात आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. 4 ऑक्टोबर रोजी मोदी कॅबिनेटच्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळं याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.   

2/7

अनुदान

gas cylinder price ujjwala yojana subsidy increase by 200 rupees

कॅबिनेटच्या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान आता 200 रुपयांवरून वाढून 300 रुपये करण्यात आलं आहे. यापूर्वी ओनम आणि रक्षाबंधनपूर्वी कॅबिनेटनं असाच एक निर्णय घेतला होता. ज्यावेळी एलपीजीचे दर 200 रुपयांनी कमी करण्यात आले होते. ज्यानंतर आता पुन्हा एकदा असाच एक दिलासादायक निर्णय केंद्रानं घेतला आहे.   

3/7

सिलिंडरचे दर कमी

gas cylinder price ujjwala yojana subsidy increase by 200 rupees

केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करत या निर्णयाबाबतची माहिती दिली. जिथं त्यांनी सिलिंडरचे दर 1100 रुपयांवरून आता 900 रुपयांवर आल्याचं सांगितलं.   

4/7

600 रुपयांना सिलिंडर

gas cylinder price ujjwala yojana subsidy increase by 200 rupees

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हा सिलिंडर 700 रुपयांना मिळत होता. आता 900 रुपयांच्या सिलिंडरवर 300 रुपयांचं अनुदान मिळाल्यानंतर सिलिंदरचे दर 600 रुपयांवर पोहोचले आहेत.   

5/7

दिल्लीमधील सिलिंडरचे दर

gas cylinder price ujjwala yojana subsidy increase by 200 rupees

दिल्लीमध्ये उज्ज्वला लाभार्थी सध्या 14.2 किलोग्राम सिलिंडरसाठी 703 रुपये देतात. पण, या सिलिंडरचा बाजारभाव मात्र 903 रुपये इतरा आहे. केंद्राच्या निर्णयानं हे दर 603 रुपयांवर उतरले आहेत.   

6/7

सर्वसामान्यांना दिलासा

gas cylinder price ujjwala yojana subsidy increase by 200 rupees

थोडक्यात केंद्राच्या या निर्णयामुळं सर्वसामान्यांना आणि त्यातूनही उज्ज्वया योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा लाभ घेणं शक्य होणार आहे.   

7/7

महत्त्वाचे निर्णय

gas cylinder price ujjwala yojana subsidy increase by 200 rupees

कॅबिनेटच्या या बैठकीत फक्त सिलिंडरचे दरच नव्हे कर इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिथं वन देवताच्या नावे तेलंगणामध्ये आदिवासी विश्वविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.