Xiaomi कंपनीच्या 'या' स्मार्टफोनवर मिळवा भरगच्च डिस्काऊंट!

मुंबई : दसऱ्याच्या सणानिमित्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Xiaomi 11t Pro 5G हा स्मार्टफोन बेस्ट पर्याय ठरु शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनबद्दल जाणून घ्या...

Oct 04, 2022, 16:17 PM IST
1/5

Xiaomi 11T Pro 5G Display

या Xiaomi स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच FHD + AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz असून त्याचा टच सॅम्पलिंग रेट 480Hz आहे. डिव्हाइस डॉल्बी व्हिजन आणि HDR 10+ सपोर्टसोबत उपलब्ध आहे. हँडसेट कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह येतो. यात रिडि आणि सूर्यप्रकाश मोड उपलब्ध आहेत.

2/5

Xiaomi 11T Pro 5G Specification

या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटला 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज मिळते. दुसरा प्रकार 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. हे Xiaomi स्मार्टफोनचे 3 प्रकार आहेत. परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर उपलब्ध आहे.

3/5

Xiaomi 11T Pro 5G Camera

या 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 5MP टेली मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP इन-डिस्प्ले कॅमेरा आहे. फोनमध्ये ऑडिओ झूम, 8K व्हिडिओ, व्हिडिओ प्रो मोड यासारखे कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहेत.

4/5

Xiaomi 11T Pro 5G Battery

Xiaomi च्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. हे 120W Xiaomi हायपरचार्ज तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. फोनसोबत 120W वायर्ड चार्जर उपलब्ध आहे. फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 17 मिनिटे लागतात. यात साइड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हे Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर चालते.

5/5

Xiaomi 11T Pro 5G Price and Offer

स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 34,999 रुपये आहे. सध्या Amazon वरून खरेदी केल्यास 6000 रुपयांची मोठी सूट आहे. फोनवर 30,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. हे अगदी कमी मासिक हप्त्यांवर खरेदी केले जाऊ शकते.