H3N2: लहान मुलांमधील H3N2 विषाणूची लक्षणे तुम्हाला माहिती आहे का?

H3N2 : भारतात कोविडनंतर आता इन्फ्लूएन्झाही वेगवेगळ्या प्रकारात समोर येत आहे. देशात इन्फ्लूएंझा ‘ए’च्या उपप्रकारावर h3n2 विषाणूची प्रकरणे प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे इन्फ्लूएंझा बीचे रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागले आहे.  या विषाणूची लागण होण्याची लक्षणे म्हणजे नाक वाहणे, खूप ताप, खोकला, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे इ. दिसून येतात.   

Mar 15, 2023, 16:25 PM IST
1/6

H3N2 विषाणूचा धोका

गेल्या दोन महिन्यांत भारतात इन्फ्लूएंझा-ए किंवा H3N2 विषाणूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, H3N2 विषाणूमुळे तापाची संख्या वाढली आहे. यामध्ये लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना H3N2 विषाणूचा धोका जास्त असतो.

2/6

या वर्षातील मुलांना त्रास

हा विषाणू पाच ते सात दिवस टिकतो आणि तापही तीन दिवसांत बरा होतो. पण खोकला जास्त काळ टिकतो. अगदी सौम्य प्रकरणांमध्ये, खोकला अनेक दिवस त्रासदायक असू शकतो. परंतु अलीकडे पाच वर्षांखालील मुलांनाही श्वसनाच्या समस्यांमुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

3/6

H3N2 संसर्ग कसा ओळखावा?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खूप ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, खोकला, सर्दी, नाकातून वाहणे आणि श्वसनाचा त्रास ही H3N2 विषाणूची लक्षणे असू शकतात. याशिवाय काही मुलांमध्ये जुलाब, उलट्या यासारख्या जठरासंबंधी समस्याही डॉक्टरांनी पाहिल्या आहेत. ताप काही दिवसात कमी होतो, पण खोकला वाढतच जातो. हा संसर्ग 8 ते 10 दिवस त्रास देऊ शकतो.

4/6

कोणत्या मुलांना जास्त धोका आहे?

ज्या मुलांना दम्याचा त्रास किंवा लठ्ठपणा आहे, न्यूरोलॉजिकल आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार आहेत त्यांना H3N2 संसर्गाचा धोका वाढतो. आतापर्यंत लागण झालेल्या सर्व मुलांना बरे होण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागल्याचेही आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. 5 वर्षांखालील मुले ज्यांना दमा, मधुमेह, हृदयविकार, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आहे, त्यांच्या पालकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

5/6

सतर्क राहण्याची गरज कधी आहे?

गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या बालकांची संख्या वाढली आहे. या मुलांना ऑक्सिजनची गरज होती. त्यामुळे संसर्ग होऊन तीन दिवस उलटूनही खोकला वाढत असेल आणि ताप उतरण्याचे नाव घेत नसेल, तर ते सतर्क राहण्याचे लक्षण आहे.   

6/6

H3N2 पासून कसे टाळावे?

हा फ्लू अत्यंत संसर्गजन्य आहे आणि तोंडातून आणि नाकातून पडणाऱ्या थेंबांद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. म्हणूनच स्वच्छता राखणे, तसेच मास्क घालणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसातून अनेक वेळा हात धुवा, सॅनिटायझर वापरा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा. तसेच सर्दी, खोकला आणि इतर लक्षणे असलेल्या अशा लोकांपासून अंतर ठेवा.