भारतीय पती पत्नीला एकाच हॉटेलमध्ये राहत येणार नाही; हज यात्रेसाठी का घेतला हा निर्णय?

Hajj 2025 New Rules : 2025 मधील हज यात्रेसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जोडप्यांसाठी हे नियम अतिशय महत्त्वाचे आहे. 

Aug 27, 2024, 19:13 PM IST
1/7

सौदी अरेबिया सरकारकडून हज यात्रेदरम्यान पती-पत्नीला एकाच खोलीत राहण्यास बंदी घालण्यात आलीय. 

2/7

सौदी अरेबिया सरकारने 2025 पासून हज यात्रेला जाणाऱ्या भारतीय पती-पत्नींना यापुढे एकाच खोलीत राहता येणार नाही. 

3/7

हज कमिटी ऑफ इंडियानेही याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलंय. सौदी अरेबिया सरकारने असा निर्णय घेण्यामागे कारण असं आहे की, लोक तक्रार करत होते की पती-पत्नी एकाच खोलीत राहतात, ज्यामुळे त्यांच्यात अनाचार होतो. भारतीय हज कमिटीनेही याची माहिती अरब सरकारला दिली होती.

4/7

या समस्येला तोंड देण्यासाठी हज कमिटी ऑफ इंडियाने काही नियम तयार केले आहेत त्यानुसार पती-पत्नीच्या खोल्या जवळपास असणार आहेत. 

5/7

हज समितीच्या म्हणण्यानुसार, हज यात्रेकरूंना राहण्यासाठी प्रत्येक मजल्यावर रिसेप्शनची व्यवस्था करण्यात येणार आहे, जेणेकरून पती-पत्नी त्या ठिकाणी बसून एकमेकांशी संवाद साधू शकशील. 

6/7

यापूर्वी सौदी अरेबियात हज यात्रेदरम्यान फक्त भारतीय पुरुष आणि महिलांना एकाच खोलीत राहण्याची परवानगी होती. जगातील इतर देशांतून आलेले पती-पत्नी स्वतंत्र खोलीत देण्यात येते. 

7/7

भारतातून हज यात्रेला जाणारे बहुतेक लोक कमी शिक्षित आणि वृद्ध असल्यामुळे ही सूट भारतीयांना देण्यात आली होती. पण आता भारतीय जोडप्यांनाही एका हॉटेलमध्ये राहता येणार नाही.