सी ग्रेड चित्रपटातून पदार्पण, सलमान-शाहरुखची झाली हातापायी, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

Katrina Kaif Birthday : आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचा 16 जुलैला वाढदिवस आहे. सलमान खानसह अक्षय कुमारसह तिच्या अफेयरची चर्चा झाली होती. तिच्या बर्थ डे पार्टीत सलमान आणि शाहरुख खानच भांडण झालं होतं. 

| Jul 15, 2024, 21:45 PM IST
1/10

कतरिना कैफचा जन्म 16 जुलै 1983 ला हाँगकाँगमध्ये झाला पण तशी ती मूळची लंडनची आहे. तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी आहेत, तर आई सुझान टारकोट मूळची ब्रिटिश आहे.

2/10

कतरिनाच्या लहानपणीच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. तिच्या आईने तिला आणि भावंडांना एकटीने वाढवलं. अभिनेत्रीला 6 बहिणी आणि एक भाऊ आहे. कतरिनाने तिच्या मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की, वडिलांच्या आठवणीत ती आजही भावूक होते.   

3/10

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, कतरिना कधीच शाळेत गेली नाही. तिची आई एक सामाजिक कार्यकर्ती असल्याने ती वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायची. त्यामुळे कतरिना एकूण 18 देशांमध्ये राहिली आहे.   

4/10

पण तिचं शिक्षण हे गृहशिक्षकांतून झालं असून ती घरात अभ्यास करायची. तिने वयाच्या 14 व्या वर्षी सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंगच्या जगात पदार्पण केलं. 

5/10

काही वर्षांनी कतरिना भारतात आली आणि इथल्या एका फॅशन शोदरम्यान एका दिग्दर्शकाची तिच्यावर नजर पडली. त्याने कतरिनाला चित्रपटाची ऑफर दिली आणि अशा प्रकारे तिचा बॉलिवूड प्रवास सुरू झाला. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला सी ग्रेड 'बूम' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यामध्ये तिने सुपरमॉडेलची भूमिका साकारली होती. 

6/10

कतरिना कैफच्या 27 वा वाढदिवसाच्या बर्थडे पार्टीत दोन खान एकमेकांशी भांडले होते. 2008 मध्ये शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. हा वाद हाणामारीपर्यंत गेला होता, असं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं जातं. त्यावेळी हे भांडण सोडविण्यासाठी गौरी खान आणि कतरिनाला मध्यस्थी करावी लागली होती. त्या भांडणानंतर अनेक वर्ष सलमान आणि शाहरुख यांच्यामध्ये वैर होते.   

7/10

कतरिनाचा पहिल अफेअर हे सलमान खानसोबत होतं. असं म्हणतात तिच करिअर घडविण्यामागे सलमानचा हात आहे. कतरिना आणि सलमानला बराच काळ एकत्र होते. ते दोघे लग्न करणार अशा बातम्याही समोर आल्या होत्या. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. पण त्या दोघांमध्ये आजही मैत्रीपूर्ण नात आहे.   

8/10

त्यानंतर विपुल शाहच्या नमस्ते लंडन या चित्रपटात कतरिना आणि अक्षयची जोडी पहिल्यांदाच झळकली. हा चित्रपट आणि त्यांची जोडीही हिट ठरली. यानंतर दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले. त्यानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढली अशा बातम्या समोर आल्यात. पण आजपर्यंत याबद्दल दोघे कधीही काही बोलले नाही.   

9/10

त्यानंतर अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातून रणबीर आणि कतरिना जवळ आलेत. रिपोर्ट्सनुसार, यानंतर रणबीरने कतरिनासाठी गर्लफ्रेंड दीपिकाला सोडलं होतं. नंतर रणबीर कतरिनासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. कतरिना अनेकदा रणबीरसोबत त्याच्या कुटुंबाला भेटताना दिसली होती. पण हेही नात फार काळ टिकल नाही. या ब्रेकअपमुळे कतरिना उद्ध्वस्त झाली आणि तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागल्याच बोल जात. 

10/10

मग अचानक कतरिनाचा आयुष्यात विकी कौशलची एन्ट्री झाली. हे नातं कोणालाही समजू शकलं नाही. त्यांच्या लग्नाचीच बातमी समोर आल्यानंतर चाहत्यासोबत मीडिया आणि बॉलिवूडनेही आश्चर्य व्यक्त केला. 2019 मध्ये कतरिना आणि विकीमध्ये काही तरी सुरु आहे अशा दिसत होतं. पण त्यांनी काही बोलण्यापूर्वीच लग्नाची बातमी समोर आली. 9 डिसेंबर 2021 ला त्यांनी लग्न केलं.