आपल्या तिरंग्यामध्ये एक, दोन नाही तर तब्बल सहावेळा झालाय बदल; फोटोसह जाणून घ्या माहिती

भारताचा झेंडा आत्तापर्यंत 6 वेळा बदलला गेलाय. चला तर मग जाणून घेऊयात भारताच्या झेंड्याचा इतिहास...

Aug 03, 2022, 14:34 PM IST

Har Ghar Tiranga : तुम्हाला माहितीये आपल्याला आज ज्या तिरंग्यामुळे देशभक्तीची भावना जागृत होते तो तिरंगा आधी असा नव्हता. काळाच्या ओघात यामध्ये अनेक बदल झाले आहेत. असं बोललं जातंय की, भारताचा झेंडा आत्तापर्यंत 6 वेळा बदलला गेलाय. चला तर मग जाणून घेऊयात भारताच्या झेंड्याचा इतिहास...

1/6

पहिला झेंडा

भारताचा पहिला झेंडा 1906 ला अस्तित्वात आला होता. 7 ऑगस्ट 1906 ला कोलकताच्या पारसी बागान चौकात(ग्रीन पार्क) चौकात फडकवला गेला होता. या झेंड्यामध्ये हिरवा, पिवळा आणि लाल रंगाच्या पट्ट्या पहायला मिळतात. या झेंड्यामध्ये वंदे मातरम् असं लिहिलं होतं. त्यासोबतच, या झेंड्यामध्ये 8 कमळाचे फुल, चंद्र आणि सुर्य देखील होते.

2/6

दुसरा झेंडा

भारताचा पहिला झेंडा फारकाळ अस्तित्वात राहिला नाही त्याचं कारण म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षीच त्या झेंड्यामध्ये संशोधन केलं गेलं. 1907 ला मॅडम कामा आणि त्यांच्या काही क्रांतिकारी सहकाऱ्यांना ज्यांना भारतातून काढलं होतं त्यांनी पॅरिसमध्ये भारताचा नवा झेंडा फडकवला होता. हा झेंडा साधारणत: याआधीच्या झेंड्यालाच मिळता जुळता होता. 

3/6

तीसरा झंडा

भारतामध्ये स्वातंत्र्य संग्रामाच्या प्रतिसादासोबतच भारताला आपला नवा झेंडा मिळत गेला. 1917 ला डॉ. एनी बेसेंट आणि लोकमान्य टिळक यांनी एक झेंडा फडकवला होता. या झेंड्यामध्ये 5 लाल आणि 4 हिरव्या रंगाच्या पट्ट्या होत्या. त्यासोबतच, यात सप्तर्षीला दर्शवत 7 तारे, अर्ध चंद्र आणि ग्रह होते. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात यूनियन जॅक देखील या झेंड्यात होता.

4/6

चौथा झेंडा

भारताला 1921साली चौथा झेंडा मिळाला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सेशनवेळी आंध्र प्रदेशच्या एका व्यक्तीने महात्मा गांधींना हा झेंडा दिला होता. गांधींनी यामध्ये काही बदल देखील केले. यानंतर त्यात पांढरा, हिरवा आणि लाल रंगाच्या पट्ट्या होत्या. त्यासोबतच, देशाचा विकास दर्शवण्यासाठी या झेंड्यामध्ये चरखा देखील होता.

5/6

पाचवा झेंडा

1931 मध्ये पुन्हा एकदा भारताचा झेंडा बदलला होता. हा झेंडा अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वीकारला. या झेंड्यात चरखा मध्यभागी असला तरी या झेंड्यावर केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचे पट्टे होते.

6/6

तिरंगा झेंडा

1931 मध्ये बनवलेला झेंडा आजच्या भारतीय तिरंग्याशी मिळताजुळता आहे. असं असलं तरी, 1947 मध्ये चरख्या ऐवेजी आशोक चक्राचा तिरंग्यामध्ये समावेश केला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x