IPL 2024: हार्दिकनंतर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी 'या' खेळाडूची लागणार वर्णी?

IPL 2024: टीम इंडियाचा T20 कर्णधार हार्दिक पंड्या यंदाच्या आयपीएलमध्ये पु्न्हा मुंबई इंडियन्समध्ये परतण्याची शक्यता आहे. मात्र हार्दिकनंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार कोण होणार हा मोठा प्रश्न आहे.

| Nov 25, 2023, 10:18 AM IST
1/7

हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स सोडून या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावापूर्वी 'ट्रेडिंग'मध्ये मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सामील होऊ शकतो.

2/7

हार्दिक आयपीएलचे 7 सिझन आयपीएलमध्ये मुंबईसाठी खेळला आणि 2022 च्या सिझनपूर्वी 'रिलीज' झाला. 

3/7

गुजरात टायटन्समध्ये सामील झाल्यानंतर, हार्दिकने या नवीन आयपीएल टीमला टी-20 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दोनवेळा नेलं. 

4/7

मात्र आता हार्दिक पांड्या टीमतून बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्सची धुरा कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

5/7

हार्दिकनंतर गुजरात केन विलियम्सनला कर्णधार बनवलं जाऊ शकते.

6/7

याशिवाय राशिद खानही कर्णधार होण्याच्या शर्यतीत सामील होऊ शकतो.

7/7

तसंच भारतीय कर्णधारासाठी शुभमन गिलसारखा तरुण खेळाडू टीममध्ये आहे.