Harmanpreet Kaur : 'या' महिला क्रिकेटरने रोहित-कोहलीलाही टाकले मागे! कोण आहे ही भारताची खेळाडू?

Harmanpreet Kaur : 35 वर्षीय भारतीय महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर हिने नुकताच आपला 35 वा वाढदिवस साजरा केला आहे. हरमनप्रीतने आपल्या 15 वर्षाच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करत, धोनी, कोहली आणि रोहित यांसारख्या महान खेळाडूंना मागे टाकले आहे. हरमनप्रीतने 296 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये 6500 पेक्षा अधिक धावा बनवल्या आहेत. 

Mar 08, 2024, 18:48 PM IST
1/8

हरमनप्रीत कौरने 2009 मध्ये डेब्यू केले होते. आतापर्यंत हरमनप्रीतने 5 टेस्ट मॅचेसच्या 8 इनिंग्समध्ये 131 रन्स केले आहेत, तर 130 वनडेमध्ये 5 शतक आणि 18 अर्धशतक झळकावून 3410 रन्स केले आहेत. टी 20 मध्ये हरमनप्रीतने कमालीचे प्रदर्शन करत 3204 धावा केलेल्या आहेत. यामध्ये हरमनचे 1 शतक आणि 11 अर्धशतक समाविष्ट आहेत.

2/8

हरमनप्रीतने 2016 मध्ये महिला भारतीय संघाची कमान सांभाळली होती. आतापर्यंत हरमनप्रीतने 125 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये महिला इंडियन टीमची कॅप्टन्सी कलेली आहे. 

3/8

हरमनप्रीत कौर ही टी 20 कप्तानीच्या बाबतीत धोनी, कोहली आणि रोहित यांच्यापेक्षाही वरचढ ठरली आहे. हरमनप्रीतने 106 टी 20 इंटरनॅशनलमध्ये टीमचे नेतृत्व करताना 59 वेळा संघाला जिंकण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवले आहे.

4/8

हरमनप्रीत कौरने टी-20 इंटरनॅशनलमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा जास्त मॅचेस खेळल्या आहेत. हरमनप्रीतने 161 तर रोहित आणि कोहलीने क्रमशः 151 आणि 117 टी २० इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या आहेत.

5/8

महिला क्रिकेटमध्ये हरमनप्रीतच्या नावावर वनडे आणि टी 20  इंटरनॅशनल मिळून 3000 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा रेकॉर्ड आहे. हरमनप्रीत सिंग ही ऑस्ट्रलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला बनली होती. बिग बॅशमध्ये हरमनप्रीतही सिडनी थंडरकडून खेळली होती.   

6/8

2017 च्या वर्ल्डकपमध्ये हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रलियाविरूद्ध 20 चौके आणि 7 षटकारांच्या मदतीने 171 धावांची विक्रमी पाळी खेळली होती. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात हा सर्वोच्च व्यक्तिगत स्कोर आहे. 

7/8

हरमनप्रीत कौर ही फक्त फलंदाजी नाही तर तिने गोलंदाजीने सुद्धा कमाल दाखवत आहे. हरमनप्रीतच्या नावावर टेस्टमध्ये 11, वनडेमध्ये 31, तर टी 20 मध्ये 32 विकेट्स आहेत.  

8/8

इंटरनॅशनल क्रिकेटच्या व्यतिरिक्त हरमनप्रीत कौर ही वुमेन्स प्रिमीअर लिगमध्ये (WPL)  मुंबई इंडियंसची सूद्धा कप्तानी करते, WPL च्या पहिल्या मोसमात हरमनप्रीतच्या मदतीने मुंबई इंडियंसने वुमेन्स प्रिमीअर लिगच्या पहिल्या मोसमाची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.