Health Tips : केळीची साल फेकून देण्याआधी वाचा त्याचे फायदे!

Health Benefits of Banana Peel in Marathi :  उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर अनेकदा फळे खाण्याचा सल्ला देतात. यातील केळीचे फळ बाराही महिने बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे अनेकदा लोक हे फळ खाण्यासाठी अधिक प्राधान्य देतात. तुम्हीही देखील हे फळ खात असाल आणि त्याचा साल फेकून देत असाल तर त्याचे महत्त्व आधी जाणून घ्या...   

May 28, 2023, 17:15 PM IST
1/7

केळीच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल, कॅरोटीनॉइड्स आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या शरीरात कॅन्सर निर्माण करणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढतात. कच्ची केळी खाल्ल्याने तुमची अँटिऑक्सिडंट पातळी वाढू शकते आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. 

2/7

डोळे निरोगी ठेवण्यासाठी केळीच्या सालींचे सेवन करा. केळीमधील व्हिटॅमिन ए तुमचे डोळे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.   

3/7

केळीच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता आणि जुलाबाच्या रुग्णांनी केळीची साल खावी. 

4/7

केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे मूड डिसऑर्डर आणि नैराश्यापासून आराम देते. ट्रिप्टोफॅनचे शरीरात सेरोटोनिनमध्ये रूपांतर होते, जे तुमचा मूड सुधारू शकते. 

5/7

केळी हे कॅलरी, कार्बोहायड्रेट, साखर, फायबर, प्रथिने, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचे भांडार आहे. याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि त्यांची कमतरता भासत नाही. शरीर मजबूत होण्यासाठी पोषक तत्वे आवश्यक असतात.

6/7

केळीच्या सालीतून पांढरे धागे काढून त्यात कोरफड व्हेरा जेल मिसळा. म्हणजे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील. चामखिलवर चोळल्याने ते दबून जाईल.   

7/7

त्वचा उजळण्यासाठी तुम्ही केळीची साल वापरू शकता. सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर चोळा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. हे नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्याही कमी होऊ लागतात. केळीच्या सालीमधील अँटीऑक्सिडंट्समुळे डाग दूर होतात.