'हे' 5 आजार असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये भेंडी, फायद्याऐवजी होईल नुकसान!

भेंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, काही आजारांमध्ये भेंडी खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. काही आजारांमध्ये भेंडीचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकते. 

| Jun 05, 2024, 17:59 PM IST

भेंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, काही आजारांमध्ये भेंडी खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. काही आजारांमध्ये भेंडीचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकते. 

1/7

'हे' 5 आजार असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये भेंडी, फायद्याऐवजी होईल नुकसान!

health tips 5 Harmful side effects of lady finger  you didn't know about

भेंडीची भाजी ही अनेकांची आवडती भाजी आहे. चवीलाही छान असलेली भाजी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. भेंडीची भाजी खाण्याचे हजारो फायदे असतात. भेंडीमध्ये व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नीशियम आणि फॉस्फरससारखे गुणधर्म आढळतात.   

2/7

health tips 5 Harmful side effects of lady finger  you didn't know about

मात्र, आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असली तरी भेंडीची भाजी काही आजारांमध्ये खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. या भाजीच्या सेवनाने आजार आणखी वाढू शकतो. हे पाच असे आजार आहेत जे भेंडीचे सेवन केल्यास आणखी वाढू शकतात. 

3/7

किडनी स्टोन

health tips 5 Harmful side effects of lady finger  you didn't know about

भेंडीमध्ये ऑक्सलेटची मात्रा अधिक असते. जी किडनी स्टोनचा धोका अधिक वाढवते. जर एखाद्याला किडनी स्टोनची समस्या असेल तर त्याला भेंडीचे सेवन करु नये. जर भेंडीची भाजी आवडत असेल तर प्रमाणातच खावी. 

4/7

गाउट

health tips 5 Harmful side effects of lady finger  you didn't know about

गाउटच्या रुग्णांसाठी उच्च ऑक्सलेट असलेले पदार्थ हानिकारक असतात. भेंडीत अधिक ऑक्सलेट असल्याने गुडघ्यांमध्ये वेदना आणि सूज वाढते. त्यामुळं गाउटच्या रुग्णांनी त्याचे सेवन करु नये.   

5/7

गैस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या

health tips 5 Harmful side effects of lady finger  you didn't know about

भेंडीमध्ये फायबरची मात्रा अधिक असते. जे लोक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमुळं त्रस्त आहेत किंवा पोट फुगणे, अपचनसारख्या समस्यांनी हैराण आहेत त्यांनी भेंडीचे सेव कमी प्रमाणात करावे. 

6/7

उच्च रक्तदाब

health tips 5 Harmful side effects of lady finger  you didn't know about

हायपरटेंशनच्या रुग्णांमध्ये पोटेशियमची मात्रा अधिक असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. पोटेशियम उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक ठरु शकतो. कारण यामुळं बीपीचा धोका वाढू शकतो.   

7/7

health tips 5 Harmful side effects of lady finger  you didn't know about

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)