रात्री गरम दुधात टाकून प्या 'हा' एक पदार्थ; सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट

सकाळी पोट साफ झालं नाही की चिडचिड होते. तसंच, सकाळची काम करण्यासाठीही फ्रेश वाटत नाही. अशावेळ काही नैसर्गिक उपायांचा वापर करुनही तुम्ही बद्धकोष्ठतेवर मात करु शकता. 

| May 31, 2024, 17:05 PM IST

Health Tips In Marathi:सकाळी पोट साफ झालं नाही की चिडचिड होते. तसंच, सकाळची काम करण्यासाठीही फ्रेश वाटत नाही. अशावेळ काही नैसर्गिक उपायांचा वापर करुनही तुम्ही बद्धकोष्ठतेवर मात करु शकता. 

1/8

रात्री गरम दुधात टाकून प्या 'हा' एक पदार्थ; सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट

health tips in marathi warm milk and ghee are best remedies for constipation

खाण्या-पिण्याच्या सवयी, शरीरात पाण्याची कमतरता, व्यायामाचा आभाव आणि आहारात फायबरची कमतरता यामुळं बद्धकोष्ठताची समस्या निर्माण होते. बद्धकोष्ठता असल्यास शौचालयात जोर लावाला लागतो, शौचाल कोरडी होणे, पोट फुगणे, तसंच, गुदद्वाराजवळच्या भागात रक्त येणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागते. 

2/8

health tips in marathi warm milk and ghee are best remedies for constipation

बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापरही तुम्ही करु शकता. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी गरम दूधात हा एक पदार्थ टाकून प्यायल्यास खूप फरक जाणवून येईल.

3/8

दूध

health tips in marathi warm milk and ghee are best remedies for constipation

साधारणतः दूधाचा आहारात समावेश केल्यास खूप फायदे मिळतात. दूधात कॅल्शियमची भरपूर मात्रा असते. ज्यामुळं हाडांना बळकटी येते. त्याचबरोबर यात प्रोटीन आणि व्हिटॅमिनचे गुणधर्मही आढळतात. 

4/8

तूप

health tips in marathi warm milk and ghee are best remedies for constipation

तुम्हीदेखील बद्धकोष्ठतेमुळं त्रासलेले असाल तर रात्रीच्या वेळी एक ग्लास गरम दुधात दोन चमचे तूप टाकून प्या. हे दूध प्यायल्यास सकाळी पोट साफ होईल आणि शौचालयात फार जोर काढावादेखील लागणार नाही. 

5/8

लिंबू पाणी

health tips in marathi warm milk and ghee are best remedies for constipation

जर तुम्हाला दुधाची अॅलर्जी असेल तर हे घरगुती उपायदेखील बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहेत. रात्री झोपण्याच्या आधी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास सकाळी पोट साफ होते. 

6/8

लिक्विड फुड

health tips in marathi warm milk and ghee are best remedies for constipation

बद्धकोष्ठतेवर जितके जास्त लिक्विड फुडचे सेवन केल्यास तितके जास्त फायदेशीर ठरते. अशातच सूप, गरम पाणी किंवा हर्बल टी पिऊ शकतात. 

7/8

ऑलिव्ह ऑइल

health tips in marathi warm milk and ghee are best remedies for constipation

 सकाळच्या वेळीस एक चमचा ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो. 

8/8

(Disclaimer

health tips in marathi warm milk and ghee are best remedies for constipation

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)