बर्फाच्या शुभ्र चादरीवर skiersचा मुक्तसंचार....

Jun 04, 2019, 15:36 PM IST
1/6

बर्फाच्या शुभ्र चादरीवर skiersचा मुक्तसंचार....

पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरणाऱ्या हिमाचल प्रदेशातील प्रत्य़ेक कानाकोपरा हा जणू निसर्गाचा एक अविष्कारच आहे. याचीच अनुभूती स्पितीच्या खोऱ्यातील काही छायाचित्रं पाहून येत आहे. देशाच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा वर चढत असतानाच काही राज्यांमध्ये मात्र बर्फाची चादरच पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- एएनआय)

2/6

बर्फाच्या शुभ्र चादरीवर skiersचा मुक्तसंचार....

अनेक पर्यटकांच्या मनाच्या अगदी जवळ असणाऱ्या हिमाचल प्रदेशमध्येही सध्या असंच सुरेख वातावरण पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- एएनआय)

3/6

बर्फाच्या शुभ्र चादरीवर skiersचा मुक्तसंचार....

हिमाचल प्रदेशातील स्पितीच्या खोऱ्यातील काही अद्वितीय छायाचित्र एएनाय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहेत. (छाया सौजन्य- एएनआय)

4/6

बर्फाच्या शुभ्र चादरीवर skiersचा मुक्तसंचार....

स्पिती व्हॅली म्हणजेच लाहौल स्पिती येथील ही छायाचित्र आहेत, बर्फाच्या शुभ्र चादरीवर स्किइंग करणाऱ्या काही जिगरबाजांची. (छाया सौजन्य- एएनआय)

5/6

बर्फाच्या शुभ्र चादरीवर skiersचा मुक्तसंचार....

बारालाचा आणि छत्रू मोहिमेवर असणाऱ्या एकूण सात skiersची छायाचित्र अनेकांच्याच डोळ्याचं पारणं फेडत आहेत. (छाया सौजन्य- एएनआय)

6/6

बर्फाच्या शुभ्र चादरीवर skiersचा मुक्तसंचार....

बर्फाच्छादित प्रदेशात सुरु असणाऱ्या या मोहिमेतील सहभागी skiers मध्ये भारतीय आणि बेल्जियमच्या प्रत्येकी एक आणि फ्रान्सच्या पाच skiersचा समावेश आहे. (छाया सौजन्य- एएनआय)