महाराष्ट्रातील 'या' गावात राहतात 60 करोडपती; देशातील सर्वात श्रीमंत गाव

महाराष्ट्रात एक अतिशय श्रीमंत गाव आहे. या गावात सर्वच आर्थिक दृष्ट्या सधन आहेत. यातील तब्बल 60 जणांकडे कोट्यावधीची संपत्ती आहे. 

Aug 16, 2023, 18:58 PM IST

Hiware Bazar richest village in Maharashtra : देशात अद्याप आर्थिक दरही पहायला मिळते. काही लोक खूप श्रीमंत आहेत. तर, काही लोक अत्यंत गरीब आहेत. महाराष्ट्रात मात्र, एक असे गाव आहे जे सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावात तब्बल 60 करोडपती लोक राहतात. हे देशातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून देखील ओळखले जाते. 

1/7

खेड्या पाड्यांची प्रगती म्हणेज देशाची प्रगती. असे असताना महाराष्ट्रात अद्याप अनेक खेडी सोई सुविधांपासून वंचित आहेत. मात्र, एक असं गाव आहे जे महाराष्ट्रातील करोडपतींचे गाव म्हणून ओळखले जाते. 

2/7

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हिरवे बाजार हे देशातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. 

3/7

आधुनिक शेतीच्या जोरावर या गावाने मोठी आर्थिक भरभटार केली आहे. या गावात 60 करोडपती लोक राहतात.

4/7

अहमदनगर जिल्ह्यापासून 16 KM अंतरावर हिरवे बाजार हे गाव आहे. या गावची लोकसंख्या 1200 इतकी आहे. 

5/7

या गावच्या ग्रमस्थांनी लोकसभागातून पाझर तलाव खोदले. 300 पेक्षा जास्त विहीरी बांधल्या. यामुळे येथील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला. 

6/7

गावात सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतीच्या जोरावर या गावाने मोठी प्रगती केली आहे. या गावात कोणीही बेरोजगार नाही. कोणाही गाव सोडून दुसरीकडे जात नाही.   

7/7

गावचे प्रमुख मानले जाणारे पोपटराव पवार आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नामुळे या गावाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात नावलौकिक मिळवला आहे.