'ही' आहे सर्वात जास्त वेळा पाहिली गेलेली वेब सीरिज, 670 कोटी तास वॉचटाईम... प्रत्येक सीन श्वास रोखून धरणारा

Entertainment : मनोरंजन क्षेत्रात ओटीटी असं एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट, वेबसीरिज, डॉक्यूमेंटरी पाहू शकता. सध्या अनेक ओटीटी अॅप आहे. यात रोमांटिक, अॅक्शन, थ्रिलर, विनोदी कथा पाहण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. ओटीटीवर असे चित्रपट आणि वेबसीरिज आहेत. पण  तुम्हाला माहित आहे का ओटीटीवर सर्वात जास्त पाहिली गेलेली वेब सीरिज कोणती आहे?

| Sep 24, 2024, 18:00 PM IST
1/8

'ही' आहे सर्वात जास्त वेळा पाहिली गेलेली वेब सीरिज, 670 कोटी तास वॉचटाईम... प्रत्येक सीन श्वास रोखून धरणारा

2/8

थिएटरमध्ये एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानतंर काही दिवसांनी तो ओटीटीवर प्रदर्शित केला जातो. थिएटरमध्ये न चालणाऱ्या काही चित्रपटांना ओटीटीवर मात्र लाखोत व्ह्यूज मिळतात. चित्रपटांबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेबसीरिजही उपलब्ध आहेत. यात रोमांटिक, अॅक्शन, थ्रिलर, विनोदी कथा पाहण्याचे पर्याय आहेत.

3/8

वेगवेगळ्या भाषेतील वेबसीरिज पाहण्याचं स्वातंत्र्य ओटीटीवर देण्यात आलं आहे. वेगवेगळ्या देशातील लोकं आपापल्या भाषेत वेबसीरीज पाहण्याला प्राधान्य देतात. हेच लक्षात घेऊन गाजलेल्या वेबसीरिज वेगवेगळ्या भाषेत डब केल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का ओटीटीवर सर्वात जास्त पाहिली गेलेली वेब सीरिज कोणती आहे?

4/8

ओटीटीवर अशी एक वेबसीरिज आहे जी जगभरात तब्बल 670 कोटी तास पाहिली गेली आहे. या मालिकेचे 3 सीझन, 5 पार्ट आणि 41 एपिसोड आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. जगातील सर्वाधिक वेळ पाहिलेली गेलेली ही वेबसीरिज आहे. नेटफ्लिक्स इंडियाने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे.

5/8

सात वर्षांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजला जगभरातील लोकांची पसंती मिळाली आहे. भारतातही ही वेब सारिज प्रचंड गाजली. वास्तविक ही एक स्पॅनिश क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे. या वेबसीरिजचं दिग्दर्शन एलेक्स पिना यांनी केलं आहे. या वेबसीरिजमध्ये अॅक्शनपासून रोमान्सपर्यंत सर्वकाही आहे.

6/8

जगात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या या वेबसीरिजचं नाव 'मनी हाइस्ट' असं आहे. 'मनी हाइस्ट' चा पहिला सीझन 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या सीझनपासून या वेबसीरिजची लोकांमध्ये क्रेझ निर्माण झाली. 2021 मध्ये 'मनी हाइस्ट'चा शेवटचा सीझन प्रदर्शित झाला. यादरम्यान सीरिजने विक्रम रचला.

7/8

या वेब सीरिजचा पहिला हंगाम 2017 मध्ये तर दुसरा सीझन ऑक्टोबर 2017, तिसरा सीझन 2019, चौथा सीझन 2020 आणि पाचवा सीझन 2021 मध्ये प्रदर्शित झाला.

8/8

पाच सीझनची ही वेबसीरिज जवळपास प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी आवडली, त्यामुळेच या सीरिजच्या नावे नवा विक्रम जमा झाला. जगभराती तब्बल 670 कोटी तास ही वेबसीरिज पाहिली गेली. IMDb रेटिंगमध्ये या वेब सीरिजला 10 पैकी 8.2 रेटिंग देण्यात आलं आहे. शेवटचा हंगाम प्रदर्शित होऊन 3 वर्ष झाली असली तरी अजूनही प्रेक्षकांच्या पहिल्या पसंतीची वेबसीरिज आहे.