तुम्ही अंड्याची टरफले फेकून देता? 'या' 6 कामांसाठी वापर पाहून व्हाल आश्चर्यचकित

Different Use Of Eggshells : सण्डे हो या मँडे रोज खाओ अंडी, ही जाहिरात आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. सूपर फूड असलेल्या या अंड्यामुळे आपलाला अनेक फायदे होतात. पण अंड्याच्या सालीचाही उपयोग करता येतो हे तुम्हाला माहिती आहे का? 

Jul 19, 2023, 14:33 PM IST

Different Use Of Eggshells : अंडी रोज खाण्याचा आपल्या शरीराला फायदा होत असतो. आपल्या त्वचेपासून केसांपर्यंत अंडी खाण्याचा फायदा होतो. तुम्ही अंडी खाल्ल्यावर त्याचा टरफलाचं काय करता? अंड्यासोबतच त्याच्या सालीमध्ये अनेक पौष्टिक घटक हे ऐकून तुम्ही नक्की आश्चर्यचकित व्हाल. 

 

1/10

अंड्याची टरफले कचरात समजून फेकून देत असाल आधी त्याची फायदे जाणून घ्या. ही माहिती वाचून तुम्ही नक्कीच एकही अंड्याचे टरफल फेकून देणार नाहीत. 

2/10

प्रथिने, लोह आणि अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे अंड्यामध्ये असतात. तसंच त्याचा टरफल्यामध्येही अनेक फायदेशीर परिणाम दिसून येतात. 

3/10

तुम्ही फेकलेल्या अंड्याच्या टरफल्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आजूबाजूची अनेक कामं सोपी करू शकता. या उपायाने तुमचा अनावश्यक खर्चही कमी होईल. 

4/10

अंड्याच्या टरफलामध्ये 95 टक्के कॅल्शियम कार्बोनेट असतं. त्यामुळे या टरफलाचा उपयोग तुम्ही झाडांच्या मुळांमध्ये खत म्हणून करु शकता. त्यामुळे झाड्यांची वाढ झपाट्याने होते. त्याशिवाय फुलं झाड्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.

5/10

चेहऱ्यावरील चमक वाढविण्यासाठी तुम्ही अंड्याच्या टरफलाचा वापर करु शकता. त्यासाठी अंड्याची टरफले नीट धुवून ती वाळवा आणि आता पावडर तयार करा. 

6/10

आता या पावडरमध्ये मध घालून त्याचा चेहऱ्याला स्क्रब म्हणून उपयोग करा. त्यासोबतच या पावडरमध्ये दही मिक्स करुन त्याचा फेस मास्क म्हणून वापर करु शकता.   

7/10

केसांच्या वाढीसाठीही तुम्ही अंड्याच्या टरफल्याचा वापर करु शकता. यासाठी अंड्याच्या टरफल्याची पावडर दह्यात मिक्स करा. त्यानंतर ही केसांना 20 मिनिटांसाठी लावा. आता थंड पाण्याने ती धुवून टाका. केस चमकदार आणि सुंदर दिसतील. 

8/10

अंड्याच्या टरफल्यामुळे पिवळे दात पांढरेही करू शकता. यासाठी एक चमचा अंड्याच्या टरफलाचे पावडरमध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घाला. आता त्यात खोबरेल तेल मिक्स करून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट दातांची चमक परत आणण्यासाठी उपयोगी ठरेल.   

9/10

कपड्यांची चमक वाढविण्यासाठी एका बादलीमध्ये दोन चमचे अंड्याच्या कवचांची पावडर टाकून त्यामध्ये रात्रभर कपडे भिजत ठेवा. आता दुसऱ्या दिवशी कपडे धुवून टाका.   

10/10

घरातील खरकटी भांडी चमकदार करण्यासाठी साबणाच्या पाण्यामध्ये अंड्याच्या कवचांची पावडर मिक्स केल्यास तुम्हाला नक्की फायदा दिसेल.