तुमचा-आमचा जीव वाचवणारी कोरोना वॅक्सीन नेमकी तयार होते तरी कशी? - पाहा
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनावर मात मिळवण्यासाठी अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना कोरोना लस दिली आहे. तर काही देशांमध्ये लसीकरण सुरू आहे. अशात कोरोना व्हायरसपासून आपलं संपक्षण करणारी लस नक्की कशी तयार होते? असा प्रश्न तर प्रत्येकालाचं पडला आहे. तर फायझर लस तयार होण्यासाठी जवळपास 60 दिवसांचा कालावधी लागतो.
1/9
प्रथम वैज्ञानिक मास्टर सेल बँकेतून डीएनएची एक कुपी काढतात. प्रत्येक लसीमध्ये डीएनए असतं. या कुपी 150 अंशांपेक्षा कमी तापमानात ठेवल्या जातात. ज्यामध्ये प्लाजमिड्स (Plasmids)नावाच्या डीएनएची एका छोटी रिंग असते. त्यानंतर प्लाजमिड्स वितळवून आणि ई कोली बॅक्टेरियामध्ये प्लाजमिड टाकलं जातं. एका कुपीमध्ये 5 कोटीपेक्षा जास्त लसी तयार होवू शकतात.
2/9
3/9
न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैज्ञानिक रसायनांचे मिश्रण करून बॅक्टेरिया वेगळे करतात. त्यानंतर प्लाजमिडला सेल्सपासून वेगळं करण्यात येत. अखेर त्यामधून जीवाणू काढले जातात. प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर जुन्या नमुन्याशी तुलना करून पाहिले जाते. प्लाझ्मिडची शुद्धता तपासल्यानंतर त्यामध्ये एन्झाइम्स नावाचे प्रथिने टाकले जातात.
4/9
त्यानंतर उरलेल्या जीवाणूंवर प्रक्रिया केली जाते. ज्यामधून 1 लिटर शुद्ध डीएनए मिळतो. महत्त्वाचं म्हणजे 1 बाटली डीएनएपासून 15 लाख लसी तयार होतात. डीएनएची प्रत्येक बाटली गोठविली आणि सील केली आहे. त्यानंतर एका छोट्या मॉनिटर बॉक्समध्ये बंद केलं जातं. एका कंटेनरमध्ये 48 बॅग असतात. त्यांच्याभोवती बर्फ ठेवला जातो.
5/9
6/9
7/9
8/9
यानंतर कुपी तयार केल्या जातात. हजारो कुपी धुऊन त्यांचं निर्जंतुकीकरण केलं जातं . प्रत्येक कुपी 0.45 मिलीमीटर औषधाने भरली जाते. ज्यामुळे जवळपास 7 जणांचं लसीकरण करू शकते. एका मिनिटांत 575 कुपी भरून त्यावर निळं झाकण लावलं जातं. ही लस गोठविली जाते आणि त्वरित गरम केली जाते. जास्त वेळ थंड राहिल्यानंतर त्यामधील mRNA खराब होण्याची शक्यता असते.
9/9