Sleep Time : तुमचं वय किती ? तुम्हाला किती तास झोप गरजेची जाणून घ्या

Sleep Time : झोप सगळ्यांनाच प्रिय असते. पण अलिकडे कामाचा वाढता तणाव आणि बदललेली जीवनशैलीमुळे पुरेशी झोप होत नाही. या परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यवर होतो. जाणून घ्या वयानुसार तुम्हाला किती तास झोप गरजेची आहे. 

Sep 23, 2023, 13:28 PM IST

Sleep Time : झोप ही अतिशय महत्त्वाची आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. अनेक वेळा अपुरा झोपेमुळे तुमचं दिवस खराब जातो. तुमचं मानसिक आरोग्य असो किंवा शारीरिक अपुऱ्या झोपमुळे त्यावर वाईट परिणाम होतात. 

1/9

अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फाऊंडेशनने एक संशोधन केलं आहे. त्यानुसार प्रत्येकाला वयाच्या हिशोबाने झोपेची आवश्यकता असते. पुरेशी झोप झाल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. त्यामुळे वयानुसार तुम्हाला किती तासांची झोप आवश्यक आहे ते जाणून घेऊयात. 

2/9

वय : 0 ते 3 महिने, किती तास झोप हवी? : 14 ते 17 तास

3/9

वय : 4 ते 11 महिने, किती तास झोप हवी? : 12 ते 15 तास

4/9

वय : 1 ते 2 वर्ष, किती तास झोप हवी? : 11 ते 14 तास

5/9

वय : 3 ते 5 वर्ष, किती तास झोप हवी? : 10 ते 13 तास

6/9

वय : 6 ते 13 वर्ष, किती तास झोप हवी? : 9 ते 11 तास  

7/9

वय : 14 ते 17 वर्ष, किती तास झोप हवी? : 8 ते 10 तास

8/9

 वय : 18 ते 64 वर्ष, किती तास झोप हवी? : 7 ते 9 घंटे

9/9

वय : 65 वर्षांवरील व्यक्ती, किती तास झोप हवी? : 7 ते 8 तास