बाबांनी ‘तो’ फोन उचलला नसता तर स्वप्निल जोशी कधी स्क्रीनवर आलाच नसता!

लोकप्रिय मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. स्वप्निल जोशी हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. त्यात रामायणात या मालिकेतील त्याची कुश ही भूमिका तर सगळ्यांनाच माहित आहे. या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्वप्निलनं जागा केली होती. आज स्वप्निलच्या वाढदिवसानिमित्तानं त्याला ही भूमिका कशी मिळाली हे जाणून घेऊया. 

| Oct 18, 2023, 18:55 PM IST
1/7

स्वप्निल जोशी

how swapnil joshi got kush role in ramayana

गणेशोत्सवा निमित्तानं स्वप्निल ज्या चाळीत राहत होता तिथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील नाटकात स्वप्निलनं काम केलं. तर त्यावेळी रामायणात लवणासूर नावाच्या राक्षसाची भूमिका साकरणारे अभिनेते विलास राज हे त्या ताळईत असलेल्या कोणाच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांची नजर स्वप्निलवर पडली. 

2/7

काय म्हणाले होते विलास राज?

how swapnil joshi got kush role in ramayana

स्वप्निलला पाहताच त्यांनी विचारलं की हा मुलगा कोणाचा आहे. मोहन जोशी यांचा मुलगा आहे असं त्यांना शेजारच्या काकांनी सांगताच त्यांनी स्वप्निलच्या वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. स्वप्निलच्या वडिलांसमोर त्यांनी त्याच्या अभिनयाची स्तुती केली आणि त्याचा एक फोटो मागितला. तर त्याच्या वडिलांनी त्याचा वाढदिवसाचा फोटो अल्बममधून काढून घेतला. 

3/7

सागर आर्ट्समधून आले सतत फोन

how swapnil joshi got kush role in ramayana

स्वप्निल राहत होता त्या चाळीत एकच फोन होता. तर सागर आर्ट्समधून फोन आला आणि त्यांनी वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या वडिलांना वाटलं की कोणी तरी त्यांची थट्टा करतय म्हणून चार-पाच दिवस त्यांनी घरी कोणी नाही असं सांगत फोनला उत्तर दिले नाही. 

4/7

स्वत: मोती सागर यांनी केला कॉल

how swapnil joshi got kush role in ramayana

सातव्या दिवशी स्वत: मोती सागर यांनी कॉल केला आणि ते ओरडले की मी इतके दिवस फोन करत होतो. तुमचा मुलगा रामानंद सागर यांना आवडलाय. त्यानंतर त्यांना समजलं कि विलास राज यांनी तो फोटो ऑफिसमध्ये ठेवला होता कारण आम्ही लव कुशचा शोध घेत होतो.

5/7

प्रेम सागर आणि आनंद सागर यांची भेट

how swapnil joshi got kush role in ramayana

रामानंद सागर यांना स्वप्निल आणि त्याच्या वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त करताच त्यांना आश्चर्य झाले. तर जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा स्वप्निलचे वडील रडू लागले. कारण मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबातून असताना प्रेम सागर आणि त्यानंतर आनंद सागर यांना भेटलो. त्यांनी खूप गप्पा मारल्या आणि नंतर कॉल करू असं स्वप्निलला सांगितलं. 

6/7

रामानंद सागर यांची भेट

how swapnil joshi got kush role in ramayana

स्वप्निलला नंतर कॉल आला आणि रामानंद सागर यांना मडआयलॅंड येथे रिट्रीट नावाचं हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. तिथे त्यांच्या नावावर एक खोली कायम बूक असायची आणि ते तिथेच रामायणाचे लिखाण करायचे. त्यांना आयुष्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो.

7/7

how swapnil joshi got kush role in ramayana

रामानंद सागर यांची भेट घेतल्यानंतर स्वप्निलच्या वडिलांनी तुझा जन्म सफल झाला असे त्याला सांगितलं. 'तुला भूमिका मिळो या ना मिळो पण आज तू रामानंद सागर यांच्या पायाला स्पर्श केला, तू मोठं पुण्य केलं. मला तुझा अभिमान आहे.' (All Photo Credit : Swapnil Joshi Instagram/ Social Media)