कोणत्या बोगीतून साखळी खेचली हे रेल्वे पोलिसांना कसं कळतं? जाणून घ्या...

Chain Pulling in Train : भारतीय रेल्वेचे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र ओडिशामधल्या भीषण अपघातानंतर रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना असतात पण त्यातील चेन पुलिंग ही यंत्रणा देखील महत्त्वाची असते. चेन पुलिंग म्हणजे प्रत्येक डब्यात आपत्कालीन ब्रेक बसवलेले असतात 

Jun 03, 2023, 18:13 PM IST
1/6

railway chain pulling

चेन पुलिंगमुळे ट्रेन काहीवेळा मध्येच थांबते. ट्रेनची साखळी कोणत्याही बोगीत ओढली जाऊ शकते, पण रेल्वे पोलीस किंवा रेल्वे विभागाला लगेच कळते की कोणत्या बोगीत साखळी ओढली गेली आहे.

2/6

indian railway

चेन पुलिंग करणार्‍या व्यक्तीला वाटत असेल की, कोणत्या बोगीत चेन पुलिंग झाले हे रेल्वे विभागाला कळणार नाही, तर तो त्याचा भ्रम आहे. चेन पुलिंग होताच रेल्वेला कळते.

3/6

loco pilot

जर एखाद्या व्यक्तीने ट्रेनमध्ये चेन खेचली तर ट्रेनच्या लोको पायलटला कळते की कोणीतरी ट्रेनची चेन ओढली आहे, त्यानंतर तो 3 वेळा हॉर्न वाजवतो. त्यानंतर साखळी ओढल्यानंतर पायलट जोपर्यंत ट्रेन थांबवण्यासाठी सुरक्षित जागा मिळत नाही तोपर्यंत ट्रेन थांबवत नाही.

4/6

chain alarm system

ट्रेनच्या प्रत्येक डब्याच्या बाहेर चेन अलार्म सिस्टम किंवा चेन लाइट सिस्टीम बसवण्यात आलेली असते. दिवसा कोणत्या कोचमधून चेन पुलिंग केले गेले आहे हे जाणून घेण्यासाठी चेन अलार्म सिस्टम उपयुक्त आहे. चेन लाइट सिस्टीमचा उपयोग  रात्रीच्या चेन पुलिंगसाठी  केला जातो.

5/6

chain puling

ट्रेन थांबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखळीचा एक भाग डब्याच्या आत असतो, तर दुसरा भाग डब्याच्या बाहेर सॉकेटमध्ये अडकलेला असतो. आता जेव्हा ट्रेन थांबवण्यासाठी डब्यातून साखळी ओढली जाते, तेव्हा डब्याच्या बाहेर लटकलेली साखळी सॉकेटला लटकते आणि तीच लटकलेली साखळी पाहून गार्ड कोणत्या डब्यातून साखळी खेचली गेलीय हे शोधतो.

6/6

railway police

साखळी ओढली की ट्रेन थांबवली जाते. त्यानंतर रेल्वे पोलिसांकडून चेन पुलर्सचा शोध घेण्यासाठी जुने तंत्रज्ञान वापरते. चेन पुलिंग करताच हवेच्या गळतीचा आवाज ट्रेनच्या बोगीतून येतो. या आवाजाच्या मदतीने पोलीस साखळी ओढणाऱ्यापर्यंत पोहोचतात. याशिवाय काही गाड्यांमध्ये साखळी ओढताना बोगीच्या वरच्या कोपऱ्यात बसवलेला व्हॉल्व्ह फिरतो. हा फिरणारा व्हॉल्व्ह पाहून रेल्वे पोलिसांना कोणत्या बोगीत इमर्जन्सी ब्रेक लावला आहे हे कळते.