Cleaning hacks : नॉन स्टिकची भांडी चुकीच्या पद्धतीने साफ करताय? सोपी पद्धत एकदा जाणूनच घ्या...

नॉन स्टिक कुकवेयर कसं साफ करायचं हा गृहिणींना हमखास पडलेला प्रश्न आहे, कारण  नॉनस्टिकची भांडी लवकर खराब होतात.

Jan 29, 2023, 17:49 PM IST

Cleaning Hacks: आजकाल प्रत्येक किचनमध्ये नॉनस्टिकची भांडी असतातच. सतत वापरून नॉनस्टिक भांडी खराब होऊ शकतात. नॉनस्टिकची भांडी चुकीच्या पद्धतीने साफ केली तर ती लवकर खराब होऊ शकतात. म्हणूनच आज जाणून घेऊया नॉनस्टिक पॅन साफ करण्याची योग्य पद्धत.

1/5

नॉनस्टिकची भांडी गरम असताना कधीच साफ करायला घेऊ नका. पूर्ण थंड होऊद्या मग धुवा. 

2/5

गरम पाण्यात साबण किंवा डिश वर्ष लिक्विड घाला आणि त्याच्या मदतीने भांडी धुवा. स्पंजच्या मदतीने हलक्या हाताने साफ करा. 

3/5

साबण किंवा डिश वॉश लिक्विड डायरेक्ट भांड्यावर वापरू नका. साबण किंवा डिश वर्ष स्पंजवर घ्या आणि मग घास. डायरेक्ट भांड्यावर टाकू नका. 

4/5

नॉनस्टिकची भांडी व्यवस्थित सुकवून घ्या. यासाठी सॉफ्ट कापड  घेऊन त्याने पुसून घ्या. काळजी घ्या की, नॉनस्टिकचं भांड सुकवताना घासताना त्यावर ओरखडे उठणार नाहीत.

5/5

नॉनस्टिक पॅन वापरत असताना, त्यात स्पेटूला जास्त घासू नका अश्याने नॉनस्टिक पॅनवर ओरखडे उठतात आणि त्यामुळे ती भांडी लवकर खराब होतात. तुम्ही सॉफ्ट स्पेटूला वापरू शकता.