स्टेशनवर सामान उचलणारा कुली बनला IAS ऑफिसर; रेल्वेच्या फ्री Wi-Fi वर केला UPSC परीक्षेचा अभ्यास

जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत याच्या बळावर अशक्य गोष्ट ही साध्य करता येवू शकते. रेल्वे स्टेशनवर सामान उचलणारा कुली IAS ऑफिसर बनला आहे. या तरुणाने रेल्वेच्या फ्री Wi-Fi वर अभ्यास करत UPSC परीक्षेची तयारी केली. मुन्नार येथील श्रीनाथनं हा तरुण जिल्हाधिकारी बनला आहे. 

Aug 03, 2023, 21:48 PM IST

IAS Sreenath K : जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत याच्या बळावर अशक्य गोष्ट ही साध्य करता येवू शकते. रेल्वे स्टेशनवर सामान उचलणारा कुली IAS ऑफिसर बनला आहे. या तरुणाने रेल्वेच्या फ्री Wi-Fi वर अभ्यास करत UPSC परीक्षेची तयारी केली. मुन्नार येथील श्रीनाथनं हा तरुण जिल्हाधिकारी बनला आहे. 

 

1/7

रेल्वे स्टेशनवर कुली असलेल्या  श्रीनाथने मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवल आहे. हमाली करणारा हा तरुण  जिल्हाधिकारी बनला आहे. 

2/7

लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यावर श्रीनाथने UPSC परिक्षा दिली. यानंतर तो आयएएस अधिकारी बनला.

3/7

श्रीनाथने प्रथम ग्राम सहाय्यक पदासाठी केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेत त्याला 82 टक्के गुण मिळाले.

4/7

श्रीनाथने  रेल्वेच्या फ्री Wi-Fi वर केला UPSC परीक्षेचा अभ्यास केला.  रेल्वे स्थानकावरच कुलीचे काम करत करत तो मोबाईलच्या मदतीने अभ्यास करत होता.

5/7

हमाली करुन कमावलेल्या पैशात त्याच्या कुटुंबियांचा जेमतेम खर्च भागत होता. अशात UPSC परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेली पुस्तके खरेदी करण्याची त्याची ऐपत नव्हती. 

6/7

आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे श्रीनाथ रेल्वे स्टेशनवर कुलीचे काम करत होता. विवाहीत असलेला श्रीनाथ घर चालवण्यासाठी प्रचंड घेत होता. सोबतच तो सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न देखील पाहत होता. 

7/7

मुन्नार येथील रहिवासी असलेल्या श्रीनाथने बडा सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात देखील आणले.