World Cup 2023 : वेस्टइंडीजनंतर आणखी एक बलाढ्य संघ विश्वचषक स्पर्धेतून आऊट, आता 'या' संघाला संधी

ODI World Cup 2023: 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतून आणखी एक बलाढ्य संघ बाहेर पडला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज (West Indies) संघ स्पर्धेतून आऊट झाला. त्यापाठोपाठ अंतिम दहा संघांमध्ये दावेदार मानला जाणारा आणखी एक संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. क्वालीफायर राऊंडमध्ये (Super Six Match) या संघाने दमदार कामगिरी केली होती, पण विश्वचषक स्पर्धेत (ODI WC 2023) खेळण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. 

| Jul 04, 2023, 22:02 PM IST
1/5

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी क्वालिफाईंग सामने खेळवले जात आहेत. यात वेस्टइंडीजनंतर आणखी एक मोठा उलटफेर पाहिला मिळाला. स्कॉटलंडने झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे झिम्ब्बाव्बेचं विश्वचषक खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. दुसरीकडे स्कॉटलंड चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

2/5

या सामन्यात स्कॉटलँडने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 234 धावा केल्या. या संपूर्ण स्पर्धेत झिम्बाब्वेची कामगिरी चांगली झाली. पण निर्णायक सामन्यात त्यांचा संघ ढेपाळला. 234 धावांचं माफक आव्हान झिम्बाब्वे संघाला पार करता आला नाही. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 41.1 षटकात अवघ्या 203 धावांवर ऑलआऊट झाला. 

3/5

या विजयामुळे स्कॉटलंड संघाला विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी निर्माण झाली आहे. याआधी 1999, 2007 आणि 2015 मध्ये स्कॉटलंड संघाने विश्वचषक स्पर्धेत एन्ट्री केली होती. पण साखळीतच त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. 2023 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने याधीच क्लालिफाय केलं आहे. आता एका जागेसाठी नेटरलँड आणि स्कॉटलंड संघात चुरस आहे. क्लालिफाईंग राऊंडमधला शेवटचा सामना स्कॉटलंड आणि नेदरलँड संघात खेळला जाणार आहे. यनंतर चित्र स्पष्ट होईल.

4/5

स्कॉटलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो गोलंदाज क्रिस सोल. सोलने अवघ्या 33 धावात झिंम्बाब्वेच्या तीन प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. यातून झिम्बाब्वेचा संघ सावरुच शकला नाही. एकामागोमाग एक विकेट गेल्या आणि झिम्बाब्वेवर पराभवाची नामुष्की ओढावली.

5/5

स्कॉटलंडचा संघ फलंदाजीतही वरचढ ठरला. पहिल्या विकेटसाठी ख्रिस्तोफर मॅकब्राइड आणि मॅथ्यू क्रॉने 56 धावांची भागिदारी केली. त्यांना ब्रँडन मॅक्युलम आणि जॉर्ज मुन्से यांनी चांगली साथ दिली. याशिवाय मायकल लिस्कने 34 चेंडूत 48 धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करुन दिली.