World Cup 2023 : बांगलादेशविरुद्ध भारताचा विजय निश्चित, 'हे' आहे खास कारण

ICC World Cup IND vs BAN: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी म्हणजे 19 ऑक्टोबरला भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवला जाणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर (MCA Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे.

| Oct 18, 2023, 20:23 PM IST
1/7

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारत चौथ्या विजयासाठी मैदानात उतरेल. पुण्यात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताची गाठ बांगलादेशशी पडणार आहे. भारताने याआधी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव केला आहे.

2/7

भारत आणि बांगलादेशच्या विश्वचषकातील कामगिरी पाहिली तर या दोनही संघात आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहेत. यातली तीन सामने भारताने तर एक सामना बांगलादेशने जिंकला आहे. 

3/7

2011, 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात भारताने बांगलादेशचा पराभव केला. तर 2007 च्या विश्वचषकात बांगलादेशने टीम इंडियाचा पराभव करत भारताला स्पर्धेतून बाहेर केलं होतं. 

4/7

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-बांगलादेश शेवटचे भिडले होते. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. भारताने पहिली फलंदाजी करताना 9 विकेट गमावत 314 धावा केल्या. तर बांगलादेशचा संघ 286 धावांवर आटोपला

5/7

एकूण कामगिरीचा विचार केला तर भारत आणि बांगलादेशदरम्यान आतापर्यंत 40 एकदिवसीय सामने खेळवण्यात आलेत. यात तब्बल 31 सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. 

6/7

बांगलादेशने भारताविरुद्धच्या आठ सामन्यात विजय मिळवलाय. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

7/7

भारत आणि बांगलादेशदरम्यान पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना 27 ऑक्टोबर 1988 ला खेळवण्यात आला होता. हा सामना भारताने तब्बल 9 विकेटने जिंकला होता.