Mahrashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण

SC Hearing on MLA Disqualification: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकाल जर ठाकरेंच्या बाजूनं लागला तर मात्र शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता..त्यामुळे शिंदेंसोबत मंत्रीपदाच्या आशेनं आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु होत्या. 

May 11, 2023, 13:08 PM IST

1/6

सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्तासंघर्षावर अंतिम निकाल येणार आहे.

2/6

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हात जोडत सत्तासंघर्ष निकालावर बोलणं टाळलं आहे. 

3/6

सुप्रीम कोर्टाबद्दल पोटतिडकीने बोलत असून, त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, असं प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलंय..

4/6

आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार हा नरहरी झिरवळांना आहे, नार्वेकरांनी आधी राजीनामा द्यावा मग बोलावं असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटल आहे. 

5/6

अपात्र ठरवण्याचा अधिकार केवळ अध्यक्षांनाच असल्याचा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केल

6/6

सुप्रीम कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवेल, असा दावा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केला आहे.