भावना गवळी, गजानन कीर्तिकर आणि.. लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेच्या 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट

लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेच्या 5 विद्यमान  खासदारांचा पत्ता कट झालाय. यवतमाळ-वाशिमच्या 25 वर्ष खासदार असलेल्या भावना गवळी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि रामटकेचे खासदार कृपाल तुमानेंचा पत्ता कट करण्यात आलाय.

Apr 03, 2024, 22:56 PM IST

Lok Sabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाच्या 5 खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आलीय... दुसरीकडे शिंदेंच्या खासदारांना मातोश्रीचे दरवाजे बंद असतील असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय.. शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना शिवसेनेत घेणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.. त्यांनी पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवावं असा सल्ला ठाकरेंनी दिलाय..

1/5

उत्तर पश्चिम मुंबईत गजानन किर्तीकर यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. 

2/5

नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या जागी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. 

3/5

रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांच्या जागी  राजू पारवे यांना तिकीट जाहीर झाले आहे. 

4/5

हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या आवजी बाबुराव कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. 

5/5

यवतमाळ - वाशिममध्ये भावना गवळी यांच्या ऐवजी राजश्री पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x