उद्यापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली टेस्ट मॅच, फ्रीमध्ये कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

IND VS NZ Test Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून याचा पहिला सामना हा बुधवार 16 ऑक्टोबर पासून खेळवला जाणार आहे. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार असून भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी ही टेस्ट सीरिज अत्यंत महत्वाची आहे. 

| Oct 15, 2024, 14:18 PM IST

 

 

1/5

काही दिवसांपूर्वीच बांगलादेश विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिज मध्ये टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकून सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये आपले पहिले स्थान मजबूत केले. आता न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकून त्यांनाही क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल. 

2/5

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला टेस्ट सामना हा बंगळुरू येथील स्टेडियमवर सकाळी 9: 30 वाजता सुरु होईल. त्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये टॉस होईल.16 ते 20 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना एम. चेन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान दुसरा टेस्ट सामना हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होईल. तसेच तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना हा 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल. 

3/5

भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सामन्याचा इतिहास पहिला तर न्यूझीलंडला भारतात टीम इंडिया विरुद्ध एकही टेस्ट सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. न्यूझीलंडची टीम यापूर्वी 2021 मध्ये टेस्ट सिरीज खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आली होती तेव्हा त्यांचा 0-1 ने पराभव झाला होता. 

4/5

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन टेस्ट सामन्यांची सीरिज प्रेक्षकांना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनलवर पाहता येतील. तर जिओ सिनेमावर या सामान्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. या टेस्ट सीरिजचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सला मिळाले आहेत. फ्री डिश वापरकर्ते टीव्हीवर टेस्ट सामना फ्रीमध्ये पाहू शकतात.

5/5

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप राखीव खेळाडू -  हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा