सूर्यकुमार यादव गंभीर जखमी, खांद्यावरुन न्याव लागलं मैदानाबाहेर; टीम इंडियासाठी वाईट बातमी

Suryakumar Yadav Injury: चेंडूचा पाठलाग करताना सूर्याने चेंडू रोखला पण तो चेंडू उचलून फेकायला लागला तेव्हा त्याच्या डाव्या पायाचा घोटा ट्विस्ट झाला. 

| Dec 15, 2023, 09:33 AM IST

Suryakumar Yadav Injury:मैदानात सूर्या वेदनेने विव्हळताना दिसला. त्यानंतर त्याला खांद्यावर घेऊन मैदानाबाहेर न्यावे लागले. सूर्याच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजाने सामन्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.

1/9

सूर्यकुमार यादव गंभीर जखमी, खांद्यावरुन न्याव लागलं मैदानाबाहेर; टीम इंडियासाठी वाईट बातमी

IND vs SA Suryakumar Yadav Injury left ankle twisted while Fielding Cricket News

Suryakumar Yadav injury:: तिसऱ्या टी-२० सामन्यात टिम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा दारुण पराभव केला. आपल्या तळपत्या बॅटने शतक ठोकणारा कॅप्टन सुर्यकुमार यादव मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज ठरला. सुर्यकुमारने टीम इंडियाचा स्कोअर बोर्ड सतत हलता ठेवला. यामुळे टीम इंडियाल 200 चा आकडा पार करता आला. दरम्यान फिल्डिंग करतना सूर्यकुमार यादवला गंभीर दुखापत झाली. 

2/9

खांद्यावर घेऊन मैदानाबाहेर

IND vs SA Suryakumar Yadav Injury left ankle twisted while Fielding Cricket News

मैदानात सूर्या वेदनेने विव्हळताना दिसला. त्यानंतर त्याला खांद्यावर घेऊन मैदानाबाहेर न्यावे लागले. सूर्याच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजाने सामन्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.

3/9

सूर्या गंभीर जखमी

IND vs SA Suryakumar Yadav Injury left ankle twisted while Fielding Cricket News

दक्षिण आफ्रिकेच्या डावात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार गंभीर जखमी झाला होता. चेंडूचा पाठलाग करताना सूर्याने चेंडू रोखला पण तो चेंडू उचलून फेकायला लागला तेव्हा त्याच्या डाव्या पायाचा घोटा ट्विस्ट झाला. 

4/9

प्रचंड वेदना

IND vs SA Suryakumar Yadav Injury left ankle twisted while Fielding Cricket News

यानंतर सूर्यकुमारला प्रचंड वेदना होऊ लागल्या. तो सीमारेषेजवळ झोपला. सूर्याला पायावर नीट उभे राहता येत नव्हते. यानंतर सुर्याला खांद्यावरुन मैदानातून बाहेर न्यावे लागले. 

5/9

सुर्याची प्रतिक्रिया

IND vs SA Suryakumar Yadav Injury left ankle twisted while Fielding Cricket News

दरम्यान आपण आता ठिक आहोत. चालू शकतो म्हणजे पाय व्यवस्थित आहे. काळजी करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया सुर्याने दिली. 

6/9

सूर्याचे झंझावाती शतक

IND vs SA Suryakumar Yadav Injury left ankle twisted while Fielding Cricket News

तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. सूर्याने अवघ्या 56 चेंडूंचा सामना करत 178 च्या स्ट्राईक रेटने 100 धावा केल्या.

7/9

भारताचा पहिला फलंदाज

IND vs SA Suryakumar Yadav Injury left ankle twisted while Fielding Cricket News

या खेळीत सूर्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले. टी-२० फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर शतक झळकावणारा सूर्या भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.

8/9

सूर्याने केली रोहितची बरोबरी

IND vs SA Suryakumar Yadav Injury left ankle twisted while Fielding Cricket News

सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये शतक झळकावून रोहित शर्माची बरोबरी केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सूर्या आता संयुक्त नंबर वन बनला आहे. सूर्यकुमार, रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी जलद क्रिकेटमध्ये प्रत्येकी चार शतके झळकावली आहेत.

9/9

सूर्यकुमार कोहलीच्या पुढे

IND vs SA Suryakumar Yadav Injury left ankle twisted while Fielding Cricket News

भारतासाठी T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादवने विराट कोहलीला मागे टाकले आहे. या फॉरमॅटमध्ये कोहलीच्या नावावर 117 षटकार आहेत, तर सूर्याच्या नावावर आता 123 षटकार आहेत. या यादीत सूर्यकुमारच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे, ज्याने एकूण 182 षटकार ठोकले आहेत.