स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करताना कोणत्या चुका टाळाव्यात? कुठं कोणत्या पद्धतीनं असायला हवा तिरंगा, पाहा...

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनी कोणत्या ठिकाणी कोणत्या आकाराचा तिरंगा फडकवतात? पाहा महत्त्वाची माहिती... 

Aug 12, 2023, 15:06 PM IST

Independence Day 2023 : भारताचा स्वातंत्र्यदिन सर्व स्तरांवर साजरा केला जातो. देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या दिवसाचा उत्साह यंदाची तितकाच आहे. असं असतानाच काही देशाचे नागरिक म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली जाणं आपल्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण, आपल्या लहानशा कृतीतून मोठ्या चुका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं देशाभिमानाचं प्रतीक असणारा तिरंगा ध्वजारोहणावेळी खालील गोष्टींची काळजी नक्की घ्या. 

1/8

ध्वजाचा आकार

Independence Day 2023 Avoid these Mistake While Displaying National Flag

ध्वजारोहणासंबंधीच्या शिष्टाचारानुसार तिरंग्याची उंची आणि रुंदी यांच्यामध्ये 3:2 असा आयताकृती आकार असणं अपेक्षित आहे. 

2/8

तिरंगा

Independence Day 2023 Avoid these Mistake While Displaying National Flag

एखाद्या कार्यालयामध्ये  6*4 इंचांचा तिरंगा टेबलावर ठेवणं योग्य. VVIP वाहनांसाठी हा आकार  9*6 इंच इतका असावा. संसद आणि काही मध्यम आकाराच्या सरकारी इमारतींवर  9*6 फुटांचा तिरंगा असावा.

3/8

VVIP विमानं

Independence Day 2023 Avoid these Mistake While Displaying National Flag

राष्ट्रपतींसाठी सेवेत असणाऱ्या VVIP विमानं आणि रेल्वेंसाठी तिरंगा ध्वजाचा आकार 18*12 इंच निश्चित करण्यात आला आहे. तर अनेक खोल्यांमध्ये एकमेकांना छेदून जाणाऱ्या दांडीवर असणारे ध्वज 3*2 फुटांचे असतात. 

4/8

इमारतीवर असणारा तिरंगा

Independence Day 2023 Avoid these Mistake While Displaying National Flag

शहीद सैनिकांच्या पार्थिवावर असणारा तिरंगा 6*4 फुट इतका मोठा असावा. गन कॅरिएज, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवनावरील तिरंगा 12*8 फुटांचा असावा. एखाद्या लहान सार्वजनिक इमारतीवर असणारा तिरंगा  5.5*3 फुटांचा असावा. तर, मोठ्या सरकारी इमारतीवरील तिरंगा 21*14 फुटांचा असावा. 

5/8

तिरंगा नेमका कसा फडकवावा

Independence Day 2023 Avoid these Mistake While Displaying National Flag

ध्वजारोहणासाठी जी व्यक्ती पुढाकार घेते त्यांनी तो योग्य दिशेनं फडकवण्यात येत आहे याबाबत लक्ष ठेवा. जेणेकरून केशरी रंग वरच्या बाजूला येईल याची काळजी घ्या. 

6/8

नुकसान नकोच

Independence Day 2023 Avoid these Mistake While Displaying National Flag

ध्वजारोहणासाठी वापरात येणाऱ्या ध्वजाच्या तिनही रंगांपैकी एकही रंगाचं नुकसान झालेलं नसावं. फडकवलेला ध्वज जमीन किंवा पाण्याला स्पर्श करत नसावा याची काळजी घेत असावं. थोडक्यात ध्वजाचं कोणत्याही प्रकारे नुकसान झालेलं नसावं. 

7/8

ध्वजारोहणाची योग्य वेळ?

Independence Day 2023 Avoid these Mistake While Displaying National Flag

देशाची नागरिक, एखादी खासगी संस्था किंवा शैक्षणिक संस्था सर्व प्रसंगी ध्वज फडकवू शकतात. आता तिरंगा कोणत्याही वेळी फडकवता येतो. 

8/8

Credits

Independence Day 2023 Avoid these Mistake While Displaying National Flag

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवरून घेण्यात आलेली आहे. सर्व छायाचित्रे- फ्रिपिक)