IND vs AFG: पहिला T20 सामना होणार रद्द? पाऊस नव्हे तर 'या' गोष्टीचा अधिक धोका

IND vs AFG T20 : भारत अफगाणिस्तानमधील पहिला टी-20 सामना रद्द होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जातेय. हा सामना कोणच्या कारणामुळे रद्द होऊ शकतो हे पाहूयात.  

Jan 11, 2024, 16:04 PM IST
1/7

टीम इंडिया अफगाणिस्तान यांच्यातील पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आज संध्याकाळी 7:00 वाजता  बिंद्रा स्टेडियम मोहालीमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या T20 सामन्याआधी मोहालीतल्या हवामानाची बरीच चर्चा होतेय.  

2/7

या सामन्यात पावसाचा धोका नसून कडाक्याच्या थंडीचा धोका असल्याचं दिसून येतंय. मोहालीमध्ये सध्या प्रचंड थंडी जाणवतेय. अशा परिस्थितीत पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान दव आणि धुक्याचा प्रभाव क्रिझवर दिसू शकतो.  

3/7

मोहालीच्या स्टेडियमवर थंडी, दव आणि धुक्याचा प्रभाव अनेकदा दिसून येतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मोहालीमध्ये किमान तापमान 5-6 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.  

4/7

सूर्यास्तानंतर प्रचंड दव पडण्याची शक्यता वर्तवली गेली असून धुकं ही एक मोठी समस्या खेळाडूंसाठी ठरु शकते. सामन्यादरम्यान धुके पडल्यास खेळाडूंना चेंडू दिसण्याची कमी होणार असल्याने मॅच देखील रद्द केली जाऊ शकते.  

5/7

मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर जानेवारीच्या हिवाळ्यात डे-नाईट टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.   

6/7

पंजाब क्रिकेट असोसिएशन या स्टेडियमवर देशांतर्गत सामने आयोजित करतं. परंतु सकाळच्या वेळेस हे सामने खेळवण्यात येतात.   

7/7

गेल्या दोन-तीन दिवसांत स्टेडियममध्ये धुके कमी झालंय. दव दूर ठेवण्यासाठी स्टेडियममध्ये रसायनाचा वापर केला जातोय.