टीम इंडियाचं मंत्रिमंडळं असतं तर... जडेजा कृषीमंत्री! कोहली, पंतकडे 'हे' मंत्रालय; पाहा Photos

What If Indian Cricket Players Form Cabinet: भारतात क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही गोष्टींबद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नवीन मंत्रीमंडळ स्थापन झालं आहे. दुसरीकडे भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप खेळत आहे. पण भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश असलेलं मंत्रीमंडळ तयार केलं तर? कोणत्या खेळाडूकडे कोणतं मंत्रालय जाईल? कोणावर कोणती जबाबदारी सोपवता येईल पाहूयात...

| Jun 24, 2024, 11:12 AM IST
1/14

Indian Cricket Players Cabinet

24 जूनपासून 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरु होत असून लोकसभा निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेले खासदार पहिल्यांदाच लोकसभेत जाणार आहेत. या खासदारांना खासदारकीची शपथ दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रीमंडळाची ओळख करुन देतील. 

2/14

Indian Cricket Players Cabinet

दुसरीकडे, वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 च्या फेरीमध्ये भारतीय संघ आज करो या मरोचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या या दोन्ही क्षेत्रांचं रिमिक्स केलं तर?   

3/14

Indian Cricket Players Cabinet

म्हणजेच भारतीय संघातील खेळाडूंचं मंत्रीमंडळ स्थापन केलं तर कोणाला कोणतं प्रोफाइल मिळेल? याचसंदर्भात AI ला विचारण्यात आलं असता भन्नाट रिझल्ट्स मिळाले. यावरच नजर टाकूयात... (येथून पुढील सर्व फोटो instagram/sahixd वरुन साभार)  

4/14

Indian Cricket Players Cabinet

खेळाडूंचं मंत्रिमंडळ स्थापनं झालं तर सरकारचं नेतृत्व सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माच करेल असं एआयचं म्हणणं आहे. म्हणजेच रोहित शर्मा या क्रिकेटपटूंच्या कॅबिनेटमध्ये पंतप्रधान असेल.

5/14

Indian Cricket Players Cabinet

विराट कोहली गृहमंत्री असेल असं एआयचं मत आहे.  

6/14

Indian Cricket Players Cabinet

आपल्या रांगड्या स्वभावासाठी आणि गावाशी नाळ जोडलेला माणूस अशी ओळख असलेल्या रविंद्र जडेजाकडे कृषीमंत्रीपद सोपवण्याचा एआयचा सल्ला आहे.

7/14

Indian Cricket Players Cabinet

उत्तम पद्धतीने धावा न देता कोणतीही धावसंख्या डिफेंड करण्याचं कौशल्य असलेला आणि वेगाने गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला संरक्षण आणि रेल्वे मंत्रालय द्यावं असं एआय सांगतं.

8/14

Indian Cricket Players Cabinet

हार्दिक पंड्याला खेळ आणि युवा मंत्रालय सोपवलं जावं असं एआयचं म्हणणं आहे.

9/14

Indian Cricket Players Cabinet

संयमी आणि शांत स्वभावाच्या के. एल. राहुलकडे जबाबदारीचं अर्थ मंत्रालय सोपवता येईल.

10/14

Indian Cricket Players Cabinet

परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार शुभमन गिलकडे सोपवता येईल असं एआयचं म्हणणं आहे.  

11/14

Indian Cricket Players Cabinet

कुलदीप यादवकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय दिलं जाव असं एआयचं अल्गोऱ्हिदम सांगतं.  

12/14

Indian Cricket Players Cabinet

जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या ऋषभ पंतला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सोपवण्याचा एआयचा सल्ला आहे. 

13/14

Indian Cricket Players Cabinet

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे अल्पसंख्यांकं मंत्रालय सोपवता येईल, असं एएआयचं म्हणणं आहे.  

14/14

Indian Cricket Players Cabinet

तुम्हाला कसं वाटलं हे खेळाडूंचं मंत्रालय? कमेंट करुन नक्की सांगा.