तुमची Reserved ट्रेन तिकीट दुसऱ्याच्या नावावर कशी कराल? Indian Railway नं सांगितला सोपा मार्ग

Indian Railways : असाच एक नियम म्हणजे रेल्वेचं आरक्षित तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्याचा.   

Oct 12, 2023, 13:40 PM IST

Indian Railways नं प्रवास करताना अनेक असे नियम आपल्या वाचनात किंवा आपल्या पाहण्यात येतात ज्यामुळं भविष्यात बरीच मदत होते. 

1/8

अनपेक्षित कारणं

Indian Railways How To Transfer A Reserved Train Ticket To Another Passenger

अनेकदा काही अनपेक्षित घटना आणि कामांमुळं बऱ्याच प्रवाशांना आरक्षित तिकीट असतानाही रेल्वेनं प्रवास करता येत नाही. सुट्टीच्या वेळीसुद्धा आखलेले बेत रद्द करावे लागतात.   

2/8

Indian Railways How To Transfer A Reserved Train Ticket To Another Passenger

3/8

Reserved तिकीट

Indian Railways How To Transfer A Reserved Train Ticket To Another Passenger

अशा वेळी प्रवास केला नाही, यापेक्षा जास्त दु:ख असतं ते म्हणजे आरक्षित आणि त्यातही Reserved तिकीट वाया गेल्याचं. आता मात्र तुम्ही गरज आहे, त्या प्रवाशाला हे तिकीट देऊ शकता इथं हे तिकीट फक्त कुटुंबातील सदस्यांनाच हस्तांतरित करता येतं.   

4/8

प्रवासातील बदलांच्या सूचना

Indian Railways How To Transfer A Reserved Train Ticket To Another Passenger

रेल्वेचा प्रवास सुरु होण्याच्या 24 तासंपूर्वी प्रवाशांनी त्यांच्या प्रवासातील बदलांच्या सूचना देणं अपेक्षित आहे. ज्यानंतर हे तिकीट नव्या प्रवाशाच्या नावावर फिरवलं जाईल.   

5/8

ओळखपत्र

Indian Railways How To Transfer A Reserved Train Ticket To Another Passenger

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा कालावधी 48 तासांपर्यंत आहे. NCC कॅण्डीडेट्सनाही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. तिकीटांचं हस्तांतरण करण्यासाठी तुमच्याकडे सरकारी ओळखपत्र असणं बंधनकारक असेल.   

6/8

प्रिंट काढून घ्या

Indian Railways How To Transfer A Reserved Train Ticket To Another Passenger

तिकीट दुसऱ्याच्या नावे करण्यासाठी सर्वप्रथम त्याची प्रिंट काढून घ्या. त्यानंतर जवळच्या रेल्वे स्थानकातील reservation counter वर जा.   

7/8

ओळखपत्र

Indian Railways How To Transfer A Reserved Train Ticket To Another Passenger

तिकीट दुसऱ्याच्या नावे करण्यासाठी जात असताना आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर्स आयडी कार्ड असणं गरजेचं असेल. तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावावर ही तिकीट करत आहात त्यांचंही आधार आणि पॅन कार्ड असणं गरजेचं.   

8/8

कन्फर्म तिकीटासाठी प्राधान्य

Indian Railways How To Transfer A Reserved Train Ticket To Another Passenger

सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत तिकीट ट्रान्सफर काऊंटरवर सुपूर्द करा. ज्यानंतर अपेक्षित व्यक्तीच्या नावावर ही तिकीट फिरवलेली असेल. एखाद्या वेळी जेव्हा दुसऱ्याच्या नावे तिकीट करण्याऐवजी confirmed तिकीट cancel केली जाते तेव्हा ती वेटिंग लिस्टमधील प्रवाशांसाठी फायद्याची ठरते. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार तिकीट रद्द केल्यानंतर यादीत पहिल्या स्थानी असणाऱ्या कन्फर्म तिकीटासाठी प्राधान्य दिलं जातं. ज्यानंतर प्रवाशांना तिकीट हस्तांतरणासंदर्भातील मेसेज दिला जातो.