चर्चा, हास्य, सेल्फी, ग्रुप फोटोसाठी गडबड अन्... I.N.D.I.A च्या बैठकीमधील Inside Photos

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting: मुंबईमधील ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या 2 दिवसीय बैठकीचा आज दुसरा दिवस असून या बैठकीमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षातील 60 हून अधिक नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीमधील काही Inside Photos समोर आलेत. याच फोटोंवर टाकलेली नजर...

| Sep 01, 2023, 12:34 PM IST
1/9

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting

विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईमधील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीमधील फोटो समोर आले आहेत. 

2/9

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting

मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये 28 पक्षांचे नेते एकत्र आले आहेत आहे. पाटणा, बंगळुरुनंतर I.N.D.I.A आघाडीची ही तिसरी बैठक आहे.

3/9

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting

I.N.D.I.A आघाडीच्या नेत्यांनी यावेळेस स्पेशल फोटोशूटही करुन घेतलं. या फोटोमध्ये अगदी सोनिया गांधींपासून ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यापर्यंत अनेक नेते दिसत आहेत. मंचावर एवढ्या मोठ्या संख्येनं नेते होते की फोटो काढण्यापूर्वी कोणी कुठं उभं राहयचं हे ठरेपर्यंतच अनेक फोटोग्राफर्सने फोटो काढून घेतले.

4/9

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting

I.N.D.I.A आघाडीची पहिली बैठक जून महिन्यात पाटण्यात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात बंगळुरुमध्ये दुसरी बैठक झाली.

5/9

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting

आता मुंबईमध्ये सुरु असलेल्या या 2 दिवसांच्या बैठकीचे निमंत्रक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.

6/9

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting

बैठकीच्या ठिकाणी अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संवाद साधताना दिसले.

7/9

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting

पीडीपीच्या नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती शरद पवारांशी चर्चा करताना.

8/9

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting

ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील गप्पांदरम्यानचा एक क्षण.

9/9

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting

शरद पवार यांच्याशी चर्चा करताना I.N.D.I.A आघाडीमधील नेते डी. राजा आणि वायको.