₹47500 कोटींची मालकीण.. ना अंबानी, ना टाटा-बिर्ला.. भारतातील सर्वात श्रीमंत महिला काय काम करते?
Richest Woman In India: भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही कदाचित नावाजलेल्या अंबानी, टाटा, अदानी, बिर्ला यासारख्या उद्योग कुटुंबातील एखाद्या महिलेचं नाव सांगाल. मात्र या प्रश्नाचं खरं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही फोटोत दिसणारी ही महिला भारतामधील सर्वात श्रीमंत महिला आहे. ही महिला आहे तरी कोण? ती करते काय? तिने इतकी संपत्ती कशी कमवली जाणून घेऊयात...
1/9
2/9
भारताला कर्तृत्ववान महिलांचा मोठा इतिहास आहे. अगदी उद्योग जगतापासून ते समाजिक कार्यापर्यंत आणि संशोधनापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत सर्वच ठिकाणी महिला पुरुषांपेक्षाही सरस कामगिरी करताना दिसत आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये आपली इच्छा शक्ती आणि नावीन्यपूर्ण विचाराच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या अनेक महिला आहेत. असाच यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे राधा वेम्बू!
3/9
राधा यांची नवीन ओळख सांगायची झालं तर त्या भारतामधील सर्वात श्रीमंत महिला आहेत. स्वत:च्या कर्तृत्वाने म्हणजेच सेल्फ मेड रिचेस्ट वुमन इन इंडिया अशी राधा यांची ओळख आहे. आता तुम्ही म्हणाल अशी किती संपत्ती त्यांच्याकडे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे 47 हजार 500 कोटी रुपये! काय आश्चर्य वाटलं की नाही? आता पुढचा प्रश्न असेल की राधा आहेत तरी कोण आणि काय काम करतात? याचसंदर्भात जाणून घेऊयात...
4/9
'2024 हुरुन इंडिया रिच लिस्ट' 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली. यामध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमधील महिलांची संख्या लक्ष वेधून घेणारी आहे. ज्यामध्ये नायकाच्या फालगुनी नायर, अरिस्ता नेटवर्कच्या जयश्री उलाल, बायोकॉनच्या किरण मुझूमदार यासारख्या महिलांचा समावेश आहे. मात्र या सर्वांमध्ये आघाडीवर आहेत त्या राधा वेम्बू! राधा या झोहो कॉर्परेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. झोहोचं मुख्यालय चेन्नईमध्ये असून ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते.
5/9
राधा वेम्बू यांचा भारतामधील सर्वात श्रीमंत महिला होण्याचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. राधा यांचा जन्म 1972 साली चेन्नईमध्ये झाला. त्यांनीच त्यांचं प्राथमिक शालेय शिक्षण चेन्नईमधील नॅशनल हायर सेकेंडरी स्कूलमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीयल मॅनेजमेंटमध्ये इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मद्रास इथून पदवी घेतली. त्यांच्या याच शिक्षणाचा त्यांना भविष्यात मोठा फायदा झाला.
6/9
राधा यांनी त्यांचा भाऊ श्रीधर वेम्बूच्या मदतीने झोहो कॉर्पेरेशन या कंपनीची स्थापना केली आणि आज ही कंपनी सॉफ्टवेअर क्षेत्रात जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. झोहोने आज उद्योगांसाठी संपूर्ण टेक्निकल पॅकेज, कोलॅब्रेशन आणि प्रोडक्टीव्हीटी अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून लाखो युझर्सला स्वत:शी जोडलं आहे. या साऱ्या प्रवासामध्ये राधा यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. झोहोमधील शेअर्सचा सर्वात मोठा वाटा राधा यांचा आहे. त्यामुळेच त्यांच्यानावर काही हजार कोटींची संपत्ती आहे. त्या झोहो मेलच्या प्रोडक्ट मॅनेजर आहेत. हा कंपनीचा सर्वात महत्त्वाचा प्रोडक्ट आहे. तसेच त्या कॉर्पस फाऊण्डेशनच्या निर्देशकही आहेत. या फाऊण्डेशनच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम केलं जातं.
7/9
8/9
9/9