'या' ऐतिहासिक वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचा मोलाचा वाटा; त्यांची नावं माहितीयेत?

International Womens Day 2024 : अशा या देशात काही वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचं मोलाचं योगदान आहे. तुम्हीही या वास्तू पाहिल्या असतील, पण त्यांच्या निर्मितीमध्ये असणारं इतिहासातील महिलांचं योगदान तुम्हाला माहितीये का? 

Mar 08, 2024, 12:08 PM IST

International Womens Day 2024 : भारताला एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या देशातील प्रत्येत प्रांतात गेलं असता तेथील इतिहास आणि ऐतिहासिक वास्तू अनेक पिढ्यांना नि:शब्द करून सोडतात. 

1/6

रानी की वाव

International Womens Day 2024 these famous Indian Monuments Built By Women in History know the list International Womens Day 2024 these famous Indian Monuments Built By Women in History know the list

मारु गुजारा प्रकाराती स्थापत्यशैलीच्या आधारे गुजरातमधील पाटन येथे ही वास्तू सरस्वती नदीच्या काठावर उभारण्यात आली. या वास्तूच्या निर्मितीमागे राणी उदयमती यांचं योगदान मोलाचं मानलं जातं. ही वास्तू त्यांनी पती, सोलंकी साम्राज्याचे राजे भीमा पहिले यांच्या स्मरणार्थ बांधली होती.     

2/6

मोहिनिश्वरा शिवालय

International Womens Day 2024 these famous Indian Monuments Built By Women in History know the list

काश्मीरच्या गुलमर्ग येथे एका लहानशा टेकडीवर हे मंदिर 1915 मध्ये उभारण्यात आलं. तत्कालीन काश्मीरचे राजे हरी सिंह यांच्या पत्नी महाराणी मोहिनीबाई सिसोदीया यांनी हे मंदिर उभारलं होतं.     

3/6

मिरजां किल्ला

International Womens Day 2024 these famous Indian Monuments Built By Women in History know the list

इतिहासातील अनेक युद्धांची साक्ष देणारा हा किल्ला आहे, कर्नाटकातील मिरजां किल्ला. गेरसोप्पाच्या महाराणी चेन्नाभैरवी यांनी हा किल्ला उभारल्याचं सांगितलं जातं.   

4/6

माहिम कॉजवे

International Womens Day 2024 these famous Indian Monuments Built By Women in History know the list

मुंबईत 1841-1846 दरम्यान, शहरातील दोन बेटं जोडण्यासाठी माहिम कॉजवेची निर्मिती करण्यात आली होती. जमशेदजी जीजीबॉय यांच्या पत्नी लेडी अवाबाई जमशेदजी जीजीबॉय यांनी या प्रकल्पासाठी त्या काळात 1,57,000 रुपये इतकी मोठी रक्कम दिली होती.   

5/6

लाल दरवाजा मशीद

International Womens Day 2024 these famous Indian Monuments Built By Women in History know the list

1447 मध्ये सुलतान मोहम्मद शारकी यांच्या बेगम राजे बिबी यांनी या मशिदीची उभारणी केली होती. तत्कालीन संत सय्यद अली दाऊद कुतूबुद्दीन यांना ही वास्तू समर्पित होती.   

6/6

हुमाहूनचा मकबरा

International Womens Day 2024 these famous Indian Monuments Built By Women in History know the list

मुघल शासक हुमायून यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी, हमीचा बानू बेगम यांनी 1569 मध्ये हा मकबरा उभारला. एका फारसी स्थापत्य कलाकारानं या मकबऱ्याची आखणी केली होती.