IPL 2023 : मोहम्मद सिराजचं नवं घर पाहण्यासाठी RCB च्या खेळाडूंची Surprise Visit

IPL 2023 : भारतीय संघ म्हणू नका किंवा मग आयपीएलची टीम. सिराजनं कायमच त्याच्या खेळाच्या बळावर या क्षेत्रात आपली वाट बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 

May 17, 2023, 11:50 AM IST

IPL 2023 : हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या मोहम्मद सिराज या खेळाडूं फार कमी वेळातच भारतीय क्रिकेट विश्वात प्रसिद्धी मिळवली आणि आता हा खेळाडू टप्प्याटप्प्यांनं यशशिखर सर करताना दिसत आहे. 

 

1/7

भारावणारे क्षण

IPL 2023 RCB Teammates visits Mohammed Siraj news home meets his Family In Hyderabad photos

अशा या खेळाडूच्या आयुष्यातील काही खास क्षण नुकतेच सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी पाहिले. कुटुंबाच्या अतिशय जवळ असणाऱ्या सिराजच्या घरी काही खास पाहुणे आले आणि हेच क्षण अनेकांना भारावून गेले.   

2/7

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

IPL 2023 RCB Teammates visits Mohammed Siraj news home meets his Family In Hyderabad photos

मोहम्मद सिराजच्या घरी आलेले हे पाहुणे म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातील खेळाडू. सनरायजर्स हैदराबादविरोधातील (SRH) सामन्यापूर्वी आरसीबीच्या (RCB) खेळाडूंनी सिराजचं घर गाठलं. 

3/7

स्वप्नांचा डोलारा

IPL 2023 RCB Teammates visits Mohammed Siraj news home meets his Family In Hyderabad photos

प्रचंड मेहनत आणि चिकाटीनं स्वप्नांचा पाठलाग करत सिराजनं हा स्वप्नांचा डोलारा उभा केला आणि क्रिकेट जगतातील बड्या खेळाडूंनी या वास्तूला भेट दिली. याहून मोठी गोष्ट काय ती? 

4/7

मेजवानीचं आयोजन

IPL 2023 RCB Teammates visits Mohammed Siraj news home meets his Family In Hyderabad photos

संघातील खेळाडूंसाठी सिराजच्या घरी मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर आरसीबीच्याच वतीनं या क्षणांचे काही फोटो शेअर करण्यात आले. 

5/7

कुटुंबीयांना कुतूहल

IPL 2023 RCB Teammates visits Mohammed Siraj news home meets his Family In Hyderabad photos

क्रिकेट क्षेत्रातील इतकी मोठी नावं आपल्या घरी आल्याचा आनंद आणि त्यांच्याप्रती असणारं कुतूहल सिराजच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळालं. 

6/7

आनंद गगनात मावेना

IPL 2023 RCB Teammates visits Mohammed Siraj news home meets his Family In Hyderabad photos

खुद्द मोहम्मद सिराजचाही आनंद या क्षणांना गगनात मावेनासा झाला होता. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासोबतच तो मोठ्या आपुलकीनं सर्वांना कुटुंबीयांसोबत भेटवत होता.   

7/7

आरसीबीचं पुढलं लक्ष्य

IPL 2023 RCB Teammates visits Mohammed Siraj news home meets his Family In Hyderabad photos

आता या भेटीगाठी झाल्या, मेजवानीवर तावही मारून झाला. आरसीबीचं पुढलं लक्ष्य असेल हैदराबादच्या संघाला नमवण्याचं. (सर्व छायाचित्र- आरसीबी/ ट्विटर)