"तुला सोडणार नाही", ऋषभ पंतच्या चाहत्याने उर्वशी रौतेलाला दिली धमकी; अभिनेत्री म्हणाली "उगाच माझं नाव...."

IPL 2023: सध्या आयपीएल (IPL) सुरु असून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एका सामन्याला हजेरी लावली होती. जेव्हा कधी उर्वशी मैदानात येते तेव्हा तिचं नाव ऋषभ पंतशी (Rishabh Pant) जोडलं होतं. यादरम्यान, पंतच्या एका चाहत्याने उर्वशीला जाहीर धमकी दिली असून त्यावर तिनेही प्रतिक्रिया दिली आहे.   

May 13, 2023, 16:20 PM IST
1/7

IPL 2023: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत यांचं नाव नेहमी जोडलं जातं. यादरम्यान उर्वशी रौतेलाला पंतच्या एका चाहत्याने धमकी दिली आहे, उर्वशीने इंस्टाग्रामला हा व्हिडीओ शेअर केला आहे.   

2/7

दिल्ली आणि हैदराबादच्या सामन्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये एक व्यक्ती पंतला आपला पाठिंबा दर्शवताना उर्वशी तुला सोडणार नाही अशी धमकी देत असल्याचं ऐकू येत आहे. यावेळी त्याने उर्वशीचं आडनाव चुकीच्या पद्धतीने घेतलं असून 'रौतेला' ऐवजी 'रोतेला' म्हटलं आहे.   

3/7

उर्वशीने सोशल मीडियार हा व्हिडीओ शेअर केला असून संताप व्यक्त करणारी एक पोस्ट लिहिली आहे.   

4/7

यामध्ये तिने 'माझं आडनाव चुकीच्या पद्दतीने घेणं बंद करा. त्यांचा काहीतरी अर्थ असतो आणि त्यात एक शक्ती आणि आशीर्वाद असतो #IDontLikeIt #NotFunny", असं म्हटलं आहे.    

5/7

यानंतर अनेकांनी उर्वशी रौतेलाला पाठिंबा दर्शवला आहे. तिने मेहनत घेऊन हे यश मिळवलं आहे, तिचा आदर करा असं एका युजरने लिहिलं आहे. तर एकाने उर्वशीला त्यांच्याकडे लक्ष देऊ नको असं सांगितलं आहे.   

6/7

दरम्यान काहींनी मात्र उर्वशीची खिल्ली उडवली आहे. फेम मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आली असं म्हणत एका युजरने कमेंट केली आहे की, तो व्हिडीओत काय बोलत आहे ते सोडा, हिला आडनाव चुकीचं घेतलं यावरुन समस्या आहे.   

7/7

ऋषभ पंत सध्याच्या आयपीएल हंगामात खेळत नाही आहे. रस्ते अपघातात जखमी झाला असल्याने तो सध्या त्यातून सावरत आहे.