Civil Engineer ते IPL Record... कोण आहे Akash Madhwal? RCB शी आहे खास कनेक्शन

Who Is Akash Madhwal: तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही, अशा शब्दांमध्येच आकाश मधवालच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं अगदी सोप्या शब्दांमध्ये वर्णन करता येईल. मात्र सिव्हील इंजिनियर असलेला हा तरुण क्रिकेटकडे कसा वळला, मुंबईच्या संघात कसा आला याचबरोबर त्याचं ऋषभ पंत कनेक्शनबद्दलही अनेकांना ठाऊक नाही. याचवर टाकलेली नजर...

| May 25, 2023, 10:07 AM IST
1/13

Who Is Akash Madhwal

इंडियन प्रमिअर लिगच्या 16 व्या पर्वातील एलिमिनेटर सामना गाजवला मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.

2/13

Who Is Akash Madhwal

आकाशने त्याच्या 3.3 ओव्हरमध्ये 5 रन देत लखनऊ सुपर जायण्ट्सच्या 5 गड्यांना तंबूत धाडलं. आकाशच्या या कामगिरीमुळे तो सर्वात कमी धावा देऊन जास्त विकेट घेणाऱ्या अनिल कुंबळे, जसप्रित बुमराह यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. 

3/13

Who Is Akash Madhwal

मुंबईच्या चाहत्यांबरोबरच जगभरातील क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेणारा आकाश रातोरात स्टार झालल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हा चमत्कार एका रात्रीत घडलेला नाही. मात्र त्याचवेळी आकाशचं क्रिकेटकडे वळणंही अगदी नियोजनपूर्वक नव्हतं हे ही तितकेच खरं.

4/13

Who Is Akash Madhwal

तुमचा विश्वास बसणार नाही पण मुंबईला आयपीएलच्या क्वालिफायर-2 मध्ये घेऊन जाणारा आकाश 4 वर्षांपूर्वी केवळ टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. त्याने सिझन बॉलला हातही लावला नव्हता.

5/13

Who Is Akash Madhwal

आकाश मधवालने सिव्हील इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणारा उत्तराखंडमधील पहिला क्रिकेटपटू आहे.

6/13

Who Is Akash Madhwal

2022 साली मुंबई इंडियन्सच्या संघाने आकाशला जखमी सुर्यकुमारच्या जागी संघात स्थान दिलं होतं. याच आकाशने आज मुंबईला क्वालिफायर्समध्ये पोहचवत सहाव्यांदा चषक जिंकण्याच्या एक पाऊल जवळ नेलं आहे.

7/13

Who Is Akash Madhwal

2019 साली पहिल्यांदा उत्तराखंडचा प्रशिक्षक वसीम जाफर आणि विद्यमान प्रशिक्षक मनिष झा यांनी आकाश मधवालचं कौशल्य हेरलं. त्यानंतर आकाशने सिझन बॉलने सराव सुरु केला. 

8/13

Who Is Akash Madhwal

यानंतर आकाशचं आयुष्य बदललून गेलं. घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्तराखंड राज्याचा कर्णधार म्हणून आकाशच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली. त्याने ही जबाबदारी अगदी छान पार पाडला.

9/13

Who Is Akash Madhwal

आकाशचं ऋषभ पंतबरोबर एक खास कनेक्शन आहे. आकाश आणि पंत हे दोघेही उत्तराखंडमधील एकाच भागातून येतात. पंत दिल्लीला शिफ्ट होण्यापूर्वी त्याला ज्या अवतार सिंह यांनी प्रशिक्षण दिलं त्यांनीच आकाशला प्रशिक्षण दिलं आहे.

10/13

Who Is Akash Madhwal

"मागील वर्षी तो सपोर्टिंग बॉलर म्हणून संघात होता. एकदा जोफरा आर्चर उपलब्ध नव्हता तेव्हा मला आकाशकडे क्षमता आहे हे ठाऊक असल्याने तो आपल्यासाठी फायद्याचा ठरु शकतो असं वाटलं. मागील काही वर्षामध्ये आपण मुंबईसाठी खेळून नंतर भारतीय संघात खेळेलेले अनेक खेळाडू पाहिले आहेत," असं रोहित आकाशसंदर्भात म्हणाला.

11/13

Who Is Akash Madhwal

"मी चांगल्या संधीची वाट पाहत होतो. मी इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र क्रिकेट माझं पॅशन आहे. त्यामुळे मी रोज प्रॅक्टीस करायचो. मी 2018 पासून आजपर्यंत याच संधीची वाट पाहत होतो," असं या सामन्यानंतर आकाश म्हणाला.  

12/13

Who Is Akash Madhwal

आकाशला 2018 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने विकत घेतलं होतं. मात्र त्याला प्रत्यक्ष सामन्यात कधी संधी मिळाली नाही. त्याने नेटमधील गोलंदाज म्हणून संघाला मदत केली होती.

13/13

Who Is Akash Madhwal

आता गुजरातविरुद्धच्या क्वलिफायर-2 च्या सामन्यात आकाश कशी कामगिरी करतो याकडे मुंबईच्या चाहत्यांसहीत सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.