मिलिंद सोमनचा निम्म्या वयाच्या अंकितासोबत साखरपुडा?

मिलिंद सोमनचा निम्म्या वयाच्या अंकितासोबत साखरपुडा?

Apr 09, 2018, 21:33 PM IST

मिलिंद सोमनचा निम्म्या वयाच्या अंकितासोबत साखरपुडा?

1/5

Is Milind Soman engaged with girlfriend

Is Milind Soman engaged with girlfriend

वयाच्या ५२ व्या वर्षी देखील तरूणींना आकर्षित करण्याची जादू ज्याकडे आहे असा मिलिंद सोमण लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने साखरपुडा केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, मिलिंदचा हा दुसरा विवाह असेल.

2/5

Milind Soman engaged with girlfriend Ankita Konwar

Milind Soman engaged with girlfriend Ankita Konwar

मिलिंद सोमण अंकितावला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आता ते दोघेही साखरपुडा करून अधिकृतरित्या नात्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

3/5

Milind Soman with girlfriend Ankita Konwar

Milind Soman with girlfriend Ankita Konwar

पण अंकिताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात अंगठी दिसत आहे. त्यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, मिलिंद आणि अंकिताने साखरपुडा केला आहे. तसेच यात तिने मिलिंदचा हात पकडला आहे आणि तिच्या बोटात एन्गेज्डमेंट रिंग स्पष्ट दिसतेय. हा फोटो पाहून मिलिंद व अंकिताने साखरपुडा केल्याचा अंदाज बांधला जात आहे.

4/5

Model Turn Actor Milind Soman engaged with girlfriend

Model Turn Actor Milind Soman engaged with girlfriend

मिलिंद काही महिन्यांपूर्वी अंकिताच्या गुवाहाटी येथील घरी गेला होता. अंकिताच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तो सहभागी झाला होता. याच निमित्ताने मिलिंद अंकिताच्या पालकांना भेटला आणि अंकिताशी लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. आधी अंकिताचे पालक वयाच्या अंतरावरून या लग्नासाठी राजी नव्हते. पण मिलिंदला प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांनी या लग्नाला होकार दिल्याचे कळतंय. 

5/5

Milind Soman`s girlfriend Ankita Konwar

Milind Soman`s girlfriend Ankita Konwar

मिलिंद सोमण याचं वय ५२ वर्षे असून त्याच्या पेक्षा अगदी अर्ध्या वयाची अंकिता कोनवार आहे. पण कुठेही त्यांच्या वयातील अंतर त्यांच्या नात्याच्या आड आलं नाही. अंकिता गुवाहाटी येथे राहणारी आहे. २०१३ मध्ये ती एअर एशियाच्या केबिन क्रूचा भाह होती. अंकिता अंदाजे वय २३-२४ वर्षे असू शकेल. अंकिताला हिंदी, बांगला, आसामी तसेच फ्रेंच आणि इंग्रजी इतक्या भाषा येतात. तिला सिनेमा पाहणे आणि स्विमिंग करणं अत्यंत आवडतं.  (फोटो साभार: @earthy_5)