भारताचे पुष्पक विमान; थेट आकाशातून लाँच करणार सॅटेलाईट

इस्रोचे पुष्पक विमान थेट स्पेसक्राफ्ट अंतराळात पोहचवणार आहे. 

Feb 29, 2024, 21:33 PM IST

ISRO's Pushpak Space Shuttle:  लवकरच भारताचे पुष्पक विमान अवकाशात भरारी घेणार आहे. या शटल स्पेसक्राफ्टच्या मदतीने थेट अंतराळात उपग्रह लाँच करता येणार आहे. पुष्पक विमान असे याचे नाव आहे. जाणून घेवूया याचे वैशिष्ट्य.

1/7

रामायणात पुष्पक विामनाचा उल्लेख आहे. भारतीय अंतराळ संस्था अर्थात ISRO पुष्पक विमान लाँच करणार आहे. 

2/7

 RLV-TD या शटल स्पेसक्राफ्ट पुन्हा एकदा पृथ्वीवर परतणार आहे. या स्पेसक्राफ्टच्या मदतीने शत्रुच्या हेरगिरीवर देखील लक्ष ठेवता येणार आहे. तसेच उपग्रह देखील नष्ट करता येणार आहे.   

3/7

RLV-TD या शटल स्पेसक्राफ्टच्या मदतीने थेट अवकाशात सॅटेलाईट लाँच करता येणार आहे. तसेच याचा वापर अंतराळात लागणाऱ्या वस्तु पोहचवण्यासाठी केला जाणार आहे. 

4/7

2 एप्रिल 2023 रोजी चित्रदुर्ग, कर्नाटक येथे ही चाचणी पार पडली. हेलिकॉप्टरमधून साडेचार किमी उंचीवरून याची चाचणी घेण्यात आली.   

5/7

ISRO, DRDO आणि IAF यांनी संयुक्तपणे या विमानाची यशस्वी चाचणी घेतली. 

6/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या भेटीदरम्यान या पुष्पक विमानाची पाहणी केली. 

7/7

RLV-TD हे खास शटल स्पेसक्राफ्ट आहे. याला पुष्पक विमान असे नाव देण्यात आले आहे.