ITR अजुनही भरला नाहीये? आता शिक्षा अटळ

Income Tax Return : वेळच्या वेळी इनकम टॅक्स भरा आणि शसनाकडून होणाऱ्या कारवाईपासून दूर राहा असंच एकसारखं सांगितलंही गेलं. पण, त्याचा काहीजणांवर मात्र परिणामच झाला नाही.  

Aug 19, 2023, 10:48 AM IST

Income Tax Return : मागील कही दिवसंपासून तुम्हाला एक मेल आणि एक मेसेल वारंवार आला असेल. आयटीआर भरा असा इशाराच या मेल किंवा मेसेजमधून देण्यात आला होता. 

 

1/7

Income Tax Return

ITR filing Income Tax Return latest update penalty news

Income Tax Return : शासकीय नियमावलीनुसार ज्यांचा पगार, उत्पन्न करपात्र रकमेच्या मर्यादेत येतं त्या सर्वांनीच कर न चुकता भरणं अपेक्षित असतं. यंदाच्या वर्षी 31 ऑगस्ट ही यासाठीची अखेरची तारीख होती. 

2/7

ITR filing Income Tax Return latest update penalty news

31 जुलै 2023 या दिवशी 2022- 2023 या आर्थिक वर्षासाठीची रक्कम कर स्वरुपात भरली जाणं अपेक्षित होतं. पण, काहींनी मात्र या अखेरच्या तारखेकडेही दुर्लक्षच केलं. आता मात्र या सर्वच मंडळींवर कारवाई केली जाणार आहे.   

3/7

संकेतस्थळावरून माहिती

ITR filing Income Tax Return latest update penalty news

Income Tax Department च्या संकेतस्थळावरून दिलेल्या माहितीनुसार एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षाही जास्त असल्यास आणि त्यांनी करचुकवेपणा केल्यास त्यांना दंडाची रक्कमही भरावी लागणार आहे.   

4/7

दंडाच्या रकमेसह कर

ITR filing Income Tax Return latest update penalty news

31 जुलै 2023 नंतर मात्र 31 डिसेंबर 2023 च्या आधी दंडाच्या रकमेसह कर भरल्यास त्यांना 5 हजार रुपयांचा फटका बसणार आहे. 5 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ITR फायलिंगसाठी उशीर झाल्यास हा दंड ठोठावला जातो.   

5/7

वार्षिक उत्पन्न

ITR filing Income Tax Return latest update penalty news

उत्पन्न 5 लाख रुपयांहून कमी आहे, तर त्यांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. पण, जर 31 डिसेंबरनंतर त्यांनी आयटीआर भरला तर मात्र त्यांना जास्तीचा दंड भरावा लागू शकतो. 

6/7

31 डिसेंबरनंतर आयटीआर भरताय?

ITR filing Income Tax Return latest update penalty news

31 डिसेंबर 2023 नंतर आयटीआर भरणाऱ्या व्यक्तीला मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. जिथं तुमची दंडात्मक रक्कम 10 हजार रुपयांवर पोहोचते. 

7/7

पडेटेड रिटर्न

ITR filing Income Tax Return latest update penalty news

पुढे 31 मार्च 2024 पर्यंत अपडेटेड रिटर्नसाठी 25 टक्के अतिरिक्त कर भरावा लागू शकतो. त्यानंतर 31 डिसेंबर 2024 पर्यंत तब्बल 50 टक्के अतिरिक्त कर भरावा लागू शकतो. त्यामुळं वेळीच कर भरा आणि जबाबदार नागरिकची कर्तव्य पार पाडा.