रविंद्र जडेजाच्या नावे नवा रेकॉर्ड; 'अशी' कामगिरी करणारा ठरला चौथा स्पिनर ऑलराऊंडर

राजकोटच्या स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामना पार पडला.  जडेजाच्या चुकीमुळे सरफराज खान रन आउट झाल्याने जडेजाला फॅन्सच्या नाराजीला सामोरं जावं लागलं.  

Feb 16, 2024, 16:44 PM IST
1/7

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातटीम इंडियाने टॉस जिंकला.  रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी सेंच्युरी करत इंग्लंडला सळो की पळो करून सोडलं.    

2/7

नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने  इंग्लंड विरुद्ध केलेल्या 326 रन पैकी  नाबाद 110 रन करत जडेजाने केले. त्यामुळे  टीम इंडियाच्या उल्लेखनीय कामगिरीकरीता जडेजाचा सिंहाचा वाटा असल्याचं म्हटलं जातंय.

3/7

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजाने तीन धावांची विक्रमी कामगिरी बजावली. आता पर्यंतच्या क्रिकेटच्या विश्वात तीन हजार धावा आणि 250 विकेट घेणारा जडेजा तिसरा भारतीय क्रिकेटर असल्याचं म्हटलं जात आहे. 

4/7

जडेजाच्या आधी कपिल देव आणि रवीचंद्रन अश्विन भारतीय क्रिकेटरने ही दमगार कामगिरी बजावली होती. 

5/7

कसोटी मालिकेत तीन हजार धावांची उल्लेखनीय कामगीरी केल्याने जडेजाच्या करीयरचा आलेख उंचावला असल्याचं म्हटलं जात आहे.

6/7

जडेजाच्या या कामगिरीने तो आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेट संघात चौथा स्पिन ऑलराउंडर ठरला आहे. 

7/7

जागतिक पातळीवर सर्वाधिक विकेट्स आणि धावा करणाऱ्यांमध्ये स्टुअर्ट ब्रॉड, सर रिचर्ड हेडली, शान पोलक, इयान बॉथम, इमरान खान, चामिंडा वास और जैक्स कैलिस ,कपिल देवआणि रवीचंद्रन अश्विन नंतर आता रवींद्र जडेजाचं नाव जोडलं जात आहे.