'मला अंडरगारमेंट्सची गरज होती...', श्रीदेवीवर बोलताना जान्हवी कपूरने केला खुलासा, म्हणाली 'आईला बोलले पण...'

Janhvi Kapoor on Sridevi : बॉलिवूडची चांदणी अशी ओळख असणाऱ्या श्रीदेवी यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. श्रीदेवीने त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती. 

Saurabh Talekar | Jul 28, 2024, 19:19 PM IST
1/5

श्रीदेवी

आजही श्रीदेवीची उणीव चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये जाणवते. अनेक वर्ष अभिनयापासून दूर राहिल्यानंतर श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून पुन्हा पदार्पण केलं होतं.

2/5

उल्झ

मात्र, तुम्हाला माहितीये का? श्रीदेवीला वाटतंच नव्हतं की आपल्या मुली मोठ्या झाल्या आहेत. जान्हवी कपूरचा उल्झ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रमोशनवेळी जान्हवीने आईचा किस्सा सांगितला.

3/5

मुलगी मोठी झाली

आईला मान्यच नव्हतं की आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि तिला अंडरगारमेंट्सची (ब्रा) गरज आहे. तिला वाटायचं की आपली मुलगी अजून लहान आहे, असं जान्हवीने म्हटलं. 

4/5

आईला बोलले...

मी जेव्हा आईला याबद्दल बोललं तेव्हा तिला वाटलं की आपली मुलगी अजूनही लहान आहे. तिला सध्या ब्राची गरज नाही. पण मी तिला समजवून सांगितलं, असंही जान्हवीने यावेळी म्हटलं.

5/5

श्रीदेवीचं करियर

दरम्यान, जेव्हा आईने करियर सोडलं, तेव्हा तिलाच काम करण्याची इच्छा नव्हती. मुलं मोठी झाली आता काम करायला हवं, असं वडील सांगत होते, असा खुलासा देखील जान्हवीने केला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x